शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

"दरेकर तमाशातील नथ नसलेली..., राज्यात भाजपचा एकही आमदार निवडून यायला नको"; जरांगेंचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2024 15:57 IST

जरांगे पाटील यांच्या पाचव्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे. सरकारकडून फोन नाही चर्चा नाही, तब्येत बरी आहे, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी उपोषणस्थळी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केली. 

पवन पवार - वडीगोद्री (जालना) : दरेकर तमाशातील नथ नसलेली मावशी आहेत. मला महिती आहे, दरेकर मला कसं बदनाम करणार आहेत? चल तुला काय करायचं कर, मी मरायला तयार आहे. तुझ्या डोक्यात फक्त एकच भूत घुसलेलं आहे देवेंद्र फडणवीस आणि सत्ता, अशा शब्दात मनोज जरांगे यांनी दरेकर यांच्यावर निशाणा साधला आहे. 

जरांगे पाटील यांच्या पाचव्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे. सरकारकडून फोन नाही चर्चा नाही, तब्येत बरी आहे, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी उपोषणस्थळी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केली. 

जरांगे म्हणाले, हे मला कधीही जेलमध्ये टाकू शकतात, निवडणुकीच्या आधी किंवा निवडणुकीनंतर. महाराष्ट्रात एकही भाजपचा आमदार निवडून आला नाही पाहिजे. मला जेलमध्ये टाकलं म्हणून कोणी खचायच नाही, मी नसलो तरी यांचा कार्यक्रम लावायचा. जातीपेक्षा नेत्याला आणि पक्षाला मोठे मानणारे लय उतावळे आहेत. मुलीच्या डोळ्यातल्या पाण्याला भंपकपणा म्हणाले का? तुम्ही लय मुजोर आहात. मी काय बोललो ते ऐकत जा दरेकर. लाडकी बहिण योजना चांगली आहे, असं म्हणलो मी. पण ती आता नव्हती पाहिजे, अस म्हणलो मी. दरेकर तुम्हाला काही कळत नाही, तुमचं लेकरू असत तर किती वाईट वाटलं असत, तुमच्यावर थुकत पण नाही आम्ही. समस्त महाराष्टातील मराठा समाजातील मुलांचा अपमान केलाय. जत्रातल्या रेवड्या वाटल्यासारखं वाटू नका, आयुष्यभराचं द्या

जरांगे पुढे म्हणाले, फार ज्ञान शिकायला लागले, महिला आठ दिवसापासून रांगेत उभ्या आहेत. हि योजना भंपक पणा अस का म्हणू नये. हे सगळ देवेंद्र फडणवीस घडवून आणत आहे, तेच बोलायला सांगतायेत. स्वतःच्या स्वार्थासाठी जातीला मारनारे मारेकरी, दोन नंबरला तुम्ही आहात दरेकर. तुम्ही किती शातीर आहे, किती मारेकरी आहे, मला आंतरवालीत बसून माहित आहे. तुम्ही माझा नाद करू नका. तुम्ही माझ्या विरोधात अभियान सहा महिन्यापासून सुरू केलं आहे. मला निवडणुकीच्या अगोदर किव्हा नंतर गुतवणार आहे...

दरेकर मराठ्यांची लोक फोडायला लागला, आमिष द्यायला लागला, देवेंद्र फडवणीस पाहिजे फक्त दरेकर यांना. मला आपले लेकरं महत्वाचं आहे. भाजपामधल्या मराठ्यांना आता जाग होण्याची वेळ आहे, माझं खोटं नाट आणणार, अभ्यासक आणणार, मला बदनाम करणार. दरेकर फडणविस यांचं ऐकून अभियान सुरू करणार आहे. मला आणि समाजाला राजकारण करायच नाही, आमच ठरलेल आरक्षण द्या. दरेकर डोळे आहेत का उघडे, उघडा, समुद्राच पाणी मारा.

देवेंद्र फडणवीस 79 हजाराने निवडूण आला आहे. फक्त, भाजपा मधल्या मराठ्यांच्या मुला-मुलींना त्रास आहे दरेकर बोलल्यापासून पूर्ण वातावरण बीथरल. मला बदनाम करणारे तुम्हाला समाजाला सामोरे जायचं आहे, दरेकर जरा लोकांकडे बघा. मी शिवाजी महाराज पुतळ्या खाली बसतो, इमानदारीने काम करतो, जातीचे काम करतो, हा दरेकर फडणविस यांच्या खाली बसला, तुझ डोकं बधीर झालं का चेक करून घे. आमच्याकडं डॉक्टर आहे.

अजित पवार टेबलाखाली बसून गप्पा मारू नका -अजित पवार टेबलाखाली बसून गप्पा मारू नका. उगाच नाकातल्या नाकात गुणगुण करू नका. शिष्टमंडळ येतात जातात आमची चहा बिस्कीट खातात, त्याची उधारी कोणी द्यायची. शिष्टमंडळाने काय केलं विचारलं का? अशी टिका ही मनोज जरांगे पाटील यांनी अजित पवारांवर केली. दरम्यान, अंबादास दानवे यांनी बैठकीला जायला हवं होत विरोधक बैठकीला आले नाही, म्हणून सरकार आव आणात आहे, असेही जरांगे म्हणाले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलpravin darekarप्रवीण दरेकरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaratha Reservationमराठा आरक्षण