जालना : नंदूरबार येथील सहायक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी निमा अरोरा यांची जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली झाली आहे. निमा अरोरा या दीड वर्षापूर्वी नंदुरबार येथे प्रांताधिकारी म्हणून रुजू होत्या. त्यांच्याकडे नंदुरबार एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिका-याचा पदभार देखील देण्यात आला होता. त्यांनी आयएएस मिळाल्यानंतरची ही पहिलीच नियुक्ती होती. शनिवारी त्यांच्या बदलीचे आदेश येथे प्राप्त झाले. जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर त्यांची नियुक्ती झाली आहे.महिला अधिका-याचा विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर काही दिवसांपूर्वी तत्कालीन मुख्याधिकारी दीपक चौधरी यांची मुंबई येथे तडकाफडकी बदली झाली होती. त्यानंतर मुख्यकार्यकारी अधिकारी पदाचा प्रभारी पदभार ग्रामीण विकास यंत्रणेचे सुरेश बेदमुथा यांच्याकडे देण्यात आला होता.
मुख्य कार्यकारी अधिकारीपदी निमा अरोरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 00:06 IST