सर्वसामान्य नागरिकांच्या स्वप्नांची घरे पक्की व मजबूत असावी म्हणून बांधकाम साहित्यदेखील दर्जेदार असावे लागते. सिमेंट, रेतीसह बांधकामात अत्यंत मोलाची भूमिका असलेल्या सळयांचा दर्जा टिकावू, मजबूत आणि उच्च असावा म्हणून राजुरी स्टील कंपनीकडून सतत नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून चांगले उत्पादन बाजारात आणले जाते. राजुरी स्टील कंपनीकडून नेहमीच अत्याधुनिक यंत्राचा वापर करून प्रयोगशाळेतील बीआयएस मानंकाप्रमाणे टीएमटी बार उत्पादन करून बाजारात पुरवठा केला जातो. राजुरी एफ इ ५००, एफइ ५०० डी, राजुरी सीआरएसला या उत्पादनाला ग्राहकांनी मोठी पसंती दर्शवली आहे. ग्राहकांच्या अपेक्षानुसार राजुरी स्टीलने आपल्या उत्पादनात वेळोवेळी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला आहे. आता कंपनीचे ‘राजुरी स्टील ५०० डी प्लस’ हे उत्पादनही लवकरच बाजारात येत असल्याची माहिती राजुरी स्टीलचे संचालक संतोष मुंदडा यांनी दिली.
क्रेडाई महाराष्ट्रच्या वतीने नाशिक शहरात नुकताच ‘क्रेडाई महाराष्ट्र लिडरशिप कॉनक्लेव २०२१’चा समारोप झाला. या कॉनक्लेवमध्ये जालन्याच्या राजुरी स्टीलनेही सहभाग घेऊन आपल्या नवीन उत्पादनाचे सादरीकरण केले. राजुरी ५०० डी प्लस या नवीन स्टीलच्या उत्पादनाची माहिती असलेल्या पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते विमोचनही करण्यात आले. नाशिक येथे झालेल्या परिषदेत या नवीन उत्पादनाची झलक पहायला मिळाली आहे. यावेळी राजुरी स्टीलचे डीलर मनू चांदवानी, राजुरी स्टीलचे अविनाश चाटे, बिपीन जुनागडे, अनुप खुळे उपस्थित होते.
फोटो - ०१जेएनपीएच ०१
===Photopath===
010221\01jan_1_01022021_15.jpg
===Caption===
राजुरी स्टील कंपनीच्या 'राजुरी ५०० डी प्लस' या नवीन उत्पादनाचे नाशिक येथे अनावरण करताना क्रेडाईचे अध्यक्ष सतीश मगर, उपाध्यक्ष शांतीलाल कटारिया, राजुरी स्टीलचे संचालक संतोष मुंदडा आदी.फोटो क्रमांक- ०१ जेएनपीएच-०१