शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

नवोदय परीक्षेला अनेक विद्यार्थी मुकणार..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 00:36 IST

नवोदयच्या परीक्षेस बसलेल्या अनेक विद्यार्थ्यांना मुकावे लागण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबदनापूर : यावर्षीपासून आॅनलाईन प्रवेशअर्ज घेतल्यामुळे व अनेक पालकांना माहिती नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे आॅनलाईन ओळखपत्रे मिळत नसल्यामुळे तालुक्यातून नवोदयच्या परीक्षेस बसलेल्या अनेक विद्यार्थ्यांना मुकावे लागण्याची शक्यता आहे. यामुळे विद्यार्थी व पालक हैराण झाले आहेततालुक्यातून एकुण ८८५ विद्यार्थी नवोदयची परीक्षा देणार आहेत. त्याकरीता जि. प. प्रशाला बदनापूर, कन्या शाळा बदनापूर, जि. प. प्रशाला शेलगाव ही तीन परीक्षा केंद्रे आहेत. या परीक्षेसाठी इयत्ता ५ वी मधील अनेक विद्यार्थ्यांनी आॅनलाइन अर्ज केले. मात्र, परीक्षा दोन दिवसांवर येऊन ठेपली असताना विद्यार्थ्यांना आॅनलाइन ओळखपत्र मिळत नसल्यामुळे या विद्यार्थ्यांमधे घबराट पसरली आहे.या परीक्षेसाठी मागील वर्षापर्यंत आॅफलाइन अर्ज घेण्यात येत होते, यावर्षी प्रथमच नवोदय परीक्षेकरीता आॅनलाइन अर्ज घेण्यात आले. परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालकांना याबाबत संगणकीय ज्ञान नव्हते. तसेच हे अर्ज भरताना शिक्षण विभागाने विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले नसल्याचेही अनेकांनी येथील गटशिक्षणाधिकाऱ्यांना भेटून याबाबत विचारणा केली असता त्यांनी हा विषय आमचा नाही, असे सांगून त्यांना नवोदय शाळेत जाण्याचा सल्ला दिला़ या तालुक्यातील वाकुळणी, बाजार वाहेगाव, चनेगाव अशा अनेक गावांमधील शाळांमधील विद्यार्थ्यांना ओळखपत्रे मिळालेली नाही. मात्र, तालुक्यात कोणत्या शाळेत किती विद्यार्थ्याना हा त्रास सहन करावा लागत आहे, याची माहिती येथील गटशिक्षणााधिकारी कार्यालयात उपलब्ध नसल्याने, याविषयी चनेगावचे सरपंच उध्दव जायभाये म्हणाले की, आमच्या गावातील ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केले ते विद्यार्थी या परीक्षेला मुकणार असल्याचे त्यांनी सांगितले.याविषयी गटशिक्षणाधिकारी एस. एन. कडेलवार म्हणाले की, आमच्याकडे काहींनी ओळखपत्रे मिळत नसल्याची तक्रार केली, यामध्ये संबंधितांनी नवोदय शाळेत जावून चौकशी केली असून, परीक्षेचा अर्ज भरताना काही तांत्रिक चूक झाल्यामुळे हे ओळखपत्र मिळणार नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्यांना परीक्षेला बसता येणार नाही असे ते म्हणाले.

टॅग्स :Educationशिक्षणexamपरीक्षाStudentविद्यार्थी