शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यात तरुणाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 00:25 IST

टीव्ही सेंटरजवळ राहणाऱ्या एका १८ वर्षाच्या युवकाचा निर्घृण खून करण्यात आल्याचे उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील टीव्ही सेंटरजवळ राहणाऱ्या एका १८ वर्षाच्या युवकाचा निर्घृण खून करण्यात आल्याचे उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली. संतप्त नातेवाईकांनी संशयित आरोपी बंटी उर्फ विनोद देवराव गायकवाड याच्या निवासस्थानी मोठा रोष व्यक्त करून घर जाळण्याचा प्रयत्न केल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. परंतु वेळीच उपस्थितांनी मध्यस्थी करून हा संतप्त जमावाला शांत केले. दरम्यान आरोपीला अटक करण्यासाठी नूतन वसाहत भागात किरकोळ स्वरूपाची दगडफेक बुधवारी दुपारी करण्यात आली. या प्रकरणात विनोद गायकवाडला अटक केली आहे.गेल्या वर्षी चार डिसेंबरला एका विवाह समारंभात कांचननगरमध्ये बंटी गायकवाड आणि मयत शाहू उर्फ राहुल कचरू उमप यांच्या नाचण्याच्या कारणावरून मोठा वादा झाला होता. हा वाद त्यावेळी उपस्थित नातेवाईकांनी मध्यस्थी करून सोडवला होता. परंतु बंटीने तुझा काटा काढतो अशी धमकी दिली होती. त्यावरून १८ जानेवारीला बंटी गायकवाड आणि राहुल उमप यांच्यात वाद झाला होता. त्यावेळीही राहुलला जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर राहुल उमप हा नेहमीप्रमाणे बक-या चारण्यासाठी जंगलात गेला होता. त्यावेळी त्याला कोंडून बेदम मारहाण करून त्याचा खून करण्यात आल्याचा आरोप राहुल उमपच्या नातेवाईकांनी पोलीस अधीक्षकांना बुधवारी दिलेल्या निवेदनात केला आहे.राहुल घरी आलाच नाहीराहुल हा बक-या चारून घरी आला नसल्याची तक्रार राहुलचा भाऊ शिवाजी उमप याने तालुका जालना पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांना राहुलचा खून झाल्याची माहिती खब-या मार्फत मिळाली. त्यांनी लगेचच राहुल ज्या कॉलनीमध्ये राहत होता, त्या भागातील विहिरींची तपासणी अग्निशमन दलाच्या पथकाकडून करण्यात आली.त्यावेळी त्या विहिरीत राहुल उपमचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी बंट गायकवाडला अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे यांनी दिली. आरोपीला अटक करण्यासाठी एक स्वतंत्र पथक नेमले होते. यात पोलीस कर्मचारी मदन, आटोळे, मुंडे, चव्हाण, पठाण, मुंडे, खरात यांचा समावेशहोता.विवाह समारंभात नृत्य करण्याच्या कारणावरून मित्र असलेल्या विकी गायकवाड सोबत क्षुल्लक वाद झाला. या वादातूनच हा खून झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. दोन दिवसांपासून गायब असलेल्या राहूलचा खून झाल्याचे कळाल्यावर परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारीJalna Policeजालना पोलीस