शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

आधी दगडाने ठेचून खून, नंतर जाळण्याचा प्रयत्न;बेपत्ता चालकाचा दोन दिवसांनी आढळला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2022 13:53 IST

प्रथम दगडाने ठेचून खून करण्यात आला. त्यानंतर ओळख पटू नये म्हणून शेतातील तुऱ्हाठ्यात मृतदेह पेटवून देण्याचा मारेकऱ्यांचा प्रयत्न असावा.

- फकीरा देशमुखभोकरदन ( जालना ) : दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका २३ वर्षीय चालकाचा शेतात वाळलेल्या गवताखाली लपवलेला मृतदेह आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास भोकरदन- जालना रोडवरील सोयगाव देवी पाटीच्या जवळ शेतात आढळून आला. भगवान राजू तळेकर असे मृत चालकाचे नाव आहे. मारेकऱ्यांनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने वाळलेल्या तुऱ्हाठ्यात मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न केल्याचा अंदाज आहे. 

शहरातील उस्मानपेठे परिसरातील भगवान राजू तळेकर हा ट्रक चालक आहे. मागील दोन दिवसांपासून तो बेपत्ता होता. दरम्यान, आज सकाळी ९ गट क्रमांक 177 मधील शेतात तुऱ्हाठया खाली एका तरुणाचा मृतदेह असल्याचे शेतकरी बाजीराव साबळे यांना आढळून आले. त्यांनी भोकरदन पोलीस ठाण्याचे सपोनि रत्नदीप जोगदंड यांना याची माहिती दिली.  त्यानंतर सपोनि जोगदंड, सपोनि राजाराम तडवी, पोलिस उपनिरीक्षक सचिन कापुरे, गणेश पायघन यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून घटनास्थळाची पाहणी केली. घटनास्थळी आधारकार्ड सापडल्याने मृतदेह भगवान तळेकर याचा असल्याचे स्पष्ट झाले. 

आधी दगडाने ठेचून खून दरम्यान, भगवान दोन दिवसांपासून घरी आलेला नव्हता असे त्याच्या आई-वडिलांनी सांगितले. भगवानचा प्रथम दगडाने ठेचून खून करण्यात आला. त्यानंतर ओळख पटू नये म्हणून शेतातील तुऱ्हाठ्यात मृतदेह पेटवून देण्याचा मारेकऱ्यांचा प्रयत्न असावा. मात्र, कोणाची तरी चाहूल लागल्याने मारेकऱ्यांनी तेथून काढता पाय घेतल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.    

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालनाDeathमृत्यू