शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लाठीहल्ल्याची न्यायालयीन चौकशी करा, त्यानंतर बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील- शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2023 08:48 IST

घटनेनंतर शरद पवार यांनी अंबड उपजिल्हा रुग्णालयात जखमींची भेट घेतल्यानंतर अंतरवाली सराटी गावाला भेट दिली.

अंतरवाली सराटी (ता. अंबड, जि. जालना) : आंदोलनस्थळी सर्व काही सुरळीत होते. पोलिस आंदोलनकर्त्यांशी संवाद साधत होते. तेव्हाच वरून (मंत्रालय) फोन आला. त्यानंतर पोलिसांनी अमानुषपणे लाठीहल्ला केल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. त्या वरून आलेल्या फोनसह या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केली. 

घटनेनंतर खा. पवार यांनी अंबड उपजिल्हा रुग्णालयात जखमींची भेट घेतल्यानंतर अंतरवाली सराटी गावाला भेट दिली. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  ते म्हणाले की, आंदोलकर्त्यांनी कायदा हातात घेण्याची कोणतीही कृती केलेली नाही. शांततापूर्ण मार्गाने आंदोलन सुरू असतानाच पोलिसांचा हल्ला अमानवी आहे. त्यात पोलिसांचा दोष नाही. त्यांना हल्ला करण्याचा आदेश कोणी दिला, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.  न्यायालयीन चाैकशीनंतर बऱ्याच गाेष्टी स्पष्ट हाेतील.

‘त्या’ घटनेनंतर मंत्र्यांनी राजीनामे दिले होते...एका प्रश्नाच्या उत्तरात पवार म्हणाले, नागपुरात २८ वर्षांपूर्वी घडलेल्या गोवारी हत्याकांडाचा काहींनी उल्लेख केला. त्यांच्या माहितीसाठी त्या घटनेनंतर  आदिवासीमंत्री मधुकरराव पिचड यांनी राजीनामा दिला. त्यानंतर गृहमंत्री आर. आर. पाटील यांनीही एका घटनेनंतर राजीनामा दिला होता. याची आठवण करून देत पवार यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारJalanaजालनाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMaratha Reservationमराठा आरक्षण