शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणला मनसेचा ‘झटका’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 00:33 IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरूवारी दुपारी मंठा येथील महावितरणच्या उपविभागीय कार्यालयात तोडफोड केली

लोकमत न्यूज नेटवर्कमंठा/तळणी: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरूवारी दुपारी मंठा येथील महावितरणच्या उपविभागीय कार्यालयात तोडफोड केली. वेळोवेळी मागण्या करूनही शेतकरी, सर्वसामान्य ग्राहकांचे वीजेचे प्रश्न सोडविण्याकडे महावितरणचे अधिकारी, कर्मचारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.मंठा तालुक्यातील अनेक गावांमध्ये खंडित वीजपुरवठ्याचा प्रश्न कायम आहे. रोहित्र जळालेले असताना ते दुरूस्त करून दिले जात नाहीत. त्यामुळे अनेक गावे अंधारात असून, शेतकऱ्यांचेही हाल होत आहेत. तर अनेकांना अव्वाच्या सव्वा बिले दिली जात आहेत.त्यामुळे महावितरण कंपनीने शहरी, ग्रामीण भागातील वीज पुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र, थकीत वीज बिलाच्या वसुलीचे कारण पुढे करीत गावा-गावातील वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम महावितरणने हाती घेतली आहे. शेतकरी, सर्वसामान्यांसमोर असलेला विजेचा प्रश्न सोडविण्याऐवजी महावितरणकडून वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने संतप्त झालेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सिध्देश्वर काकडे, सचिन काकडे, संतोष सहा (रा.जयपूर ता. मंठा जि.जालना) व इतर कार्यकर्त्यांनी गुरूवारी दुपारी मंठा येथील महावितरणच्या उपविभागीय कार्यालयात तोडफोड केली. मनसेच्या कार्यकर्त्यांनी अचानक आक्रमक भूमिका घेत खळखट्याक आंदोलाचा ‘झटका’ दिल्याने महावितरण कार्यालयाच्या आवारात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोनि विलास निकम व त्यांच्या सहका-यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. या प्रकरणात संबंधितांविरूध्द मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मनसेचे आक्रमक आंदोलन आणि त्यानंतर महावितरणकडून दिली जाणारी सेवा याकडे तालुकावासियांचे लक्ष वेधले आहे.गुन्हा दाखल: पंचायत समितीतही केली होती तोडफोडमनसेच्या या कार्यकर्त्यांनी यापूर्वी पंचायत समिती प्रशासनाकडे पाणीप्रश्न सोडवावा, अशी मागणी लावून धरली होती. मात्र, त्यावेळी प्रशासनाने मागणीकडे दुर्लक्ष केल्याने पंचायत समिती कार्यालयातही खळखट्याक आंदोलन करीत तोडफोड करण्यात आली होती. या प्रकरणात संबंधितांवर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता या कार्यकर्त्यांनी महावितरणला आंदोलनाचा चांगलाच ‘शॉक’ दिला आहे.

टॅग्स :MNSमनसेagitationआंदोलनmahavitaranमहावितरण