समीर पि. शेख जमील हा व्यापारी आहे. गुरूवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास दोन इसमांनी मारहाण करून दीड लाख रूपयांना लुटल्याची खोटी तक्रार त्याने सदर बाजार पोलीस ठाण्यात दिली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत पोलिसांनी व्यापारी समीर पि शेख जमिल याला विचारले असता, त्याने उडावाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांना शंका आल्याने त्याला पुन्हा विश्वासात घेऊन विचारले असता, लोकांची घेतलेली उधारी घेतली होती. ती उधारी देता येऊन नये म्हणून हा बनाव रचल्याच कबुली दिली. पोलिसांनी त्याची चौकशी केली असून, त्याच्याविरुध्द खोटा गुन्हा दाखल करून पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी दिली.
लुटमारीचा खोटा गुन्हा दाखल करून पोलिसांची दिशाभूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:29 IST