शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

'मी स्वकष्टाचं खातो, तुझ्यासारखं सासऱ्याच्या ...; छगन भुजबळांचा मनोज जरांगे पाटलांवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2023 16:47 IST

मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर टोला लगावला.

जालना-  राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला २४ डिसेंबरपर्यंत वेळ दिला आहे. तर दुसरीकडे ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास विरोध सुरू आहे. आज मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात जालना येथे ओबीसी समाजाचा मेळावा झाला.ल यावेळी बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली. 

मंत्री भुजबळ म्हणाले, हा छगन भुजबळ स्वकष्टाचं खातो. तुझ्यासारखं सारसऱ्याच्या घरी तुकडा मोडत नाही, असा टोला भुजबळ यांनी जरांगे पाटील यांना लगावला. आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही मात्र ओबीसीतून आरक्षण देऊ नये. 56 मराठा मोर्चे निघाले पण आम्ही कुणाला विरोध केला. मात्र आम्ही कुणाचं घरं, दारं जाळली नाहीत, असंही भुजबळ म्हणाले. 

दगडाला शेंदूर लावून हा कुठला तुमचा देव झाला? छगन भुजबळ यांची जरांगेंवर घणाघाती टीका

अंतरवली सराटी येथे पोलिसांवर झालेल्या हल्ल्यावरुन जरांगे पाटील यांच्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी आरोप केले. छगन भुजबळ म्हणाले, पोलिसांचा लाठिचार्ज सगळ्यांनी पाहिला आहे. सत्तर महिला पोलिसांसहीत दगडांचा मार खाऊन रुग्णालयात दाखल झाले. त्यांची तब्येत बिघडली म्हणून पोलिसांनी त्यांना रुग्णालयात जाण्यासाठी विनंती केली. पण, यांनी अगोदरच तयारी केली होती. त्या पोलिसांना त्यांनी अचानक दगडांचा मारा केला. पोलिस काय पाय घसरुन पडले का? असा टोलाही भुजबळ यांनी लगावला. 

"पोलिसांवर तुम्ही हल्ला केला. यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला, या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे तो बघा यात सगळं दिसत आहे, असंही भुजबळ म्हणाले. पुढे बोलताना भुजबळ म्हणाले, मंडल आयोगाने देशभर फिरून ओबीसी यांची संख्या ५४ टक्के असल्याने त्यांना २७ टक्के आरक्षणाची शिफारस करण्यात आली. तो आयोग तत्कालीन प्रधानमंत्री व्ही. पी. सिंग यांनी स्वीकारला. त्याची अंमलबाजवणी शरद पवार यांनी मुख्यमंत्री असताना केली. त्यांच्या हातात कोणाला आरक्षण देयचे नव्हते, यामुळे त्यांनी कोणाला आरक्षणापासून वंचित ठेवले, असा होत नसल्याचा खुलासा मंत्री भुजबळ यांनी आज केला.

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील