शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा-AIMIM युतीचा दुसरा अंक! एमआयएमच्या पाठिंब्यावर BJP नेत्याचा मुलगा बनला स्वीकृत नगरसेवक
2
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान कार्यालयाचा पत्ता बदलणार; 'सेवा तीर्थ'साठी किती खर्च?
3
सोन्याच्या दुकानात चोरी केली, परत जाताना गुटखा खाण्यासाठी मास्क काढला अन् सीसीटीव्हीत कैद झाला, पोहोचला तुरुंगात
4
Travel : २६ जानेवारीचा लॉन्ग वीकेंड आणि वृंदावनची वारी! कान्हाच्या नगरीत फिरण्यासाठी 'हे' आहे परफेक्ट प्लॅनिंग
5
आमचा अणुबॉम्ब भारत, इस्रायल, अमेरिकेच्या विरोधात...', अणु सिद्धांतावर पाकिस्तानचा मोठा दावा
6
"आम्ही कुणाला गुलाम बनवलं नाही, आम्ही तर...", काय म्हणाले योगी आदित्यनाथ?
7
प्यारवाली लव्हस्टोरी! ४० वर्षांनी 'ती' म्हणाली 'हो', तरुणपणी झालं नाही लग्न; आता जुळल्या रेशीमगाठी
8
मुकुल अग्रवाल यांनी विकत घेतले 100 वर्ष जुन्या कंपनीचे तब्बल 4 कोटी शेअर, ₹18 वर आलाय भाव; तुमच्याकडे आहेत का?
9
आता कानावरही विश्वास ठेवू नका; इंदूरमध्ये भावाच्या आवाजात फोन आला अन् शिक्षिकेचे ९७ हजार उडाले!
10
हॉर्मुझचा जलमार्ग इराण रोखणार? जागतिक तेल बाजार धास्तावला; पेट्रोल-डिझेलच्या किमती भडकणार?
11
BBL: बिग बॅश लीगमध्ये रिझवानचा घोर अपमान; कर्णधारानं भर मैदानातून धाडलं बाहेर, कारण काय?
12
१० प्रभागांत 'हॉट सीट'; निवडणुकीत 'बिग फाइट', भाजपचे महानगराध्यक्ष, माजी महापौर, सभापतींच्या लढतीकडे लक्ष!
13
गुंतवणूकदारांना दिलासा! टाटा स्टील आणि एसबीआयमध्ये मोठी खरेदी; निफ्टी पुन्हा २५,७०० च्या पार
14
दुसऱ्यांदा फेल झाले ISRO चे मिशन; PSLV-C62 मध्ये नेमका काय बिघाड झाला? जाणून घ्या...
15
ठाकरेंची 'मशाल' हाती घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरली बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री, गल्लोगल्ली केला प्रचार
16
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका पुढे गेल्या...! ग्रामीण भागातील निवडणुकीचे बिगुल कधी वाजणार? सर्वोच्च न्यायालयाने दिली नवी मुदत
17
सौदी अरेबियात अवैध स्थलांतरितांविरोधात मोठी कारवाई; आतापर्यंत १० हजार लोकांना देशाबाहेर हाकलले
18
राज ठाकरेंनी अदानींच्या वाढलेल्या उद्योगांवरून घेरले; अमित साटमांनी केला पलटवार, फोटो दाखवत म्हणाले...
19
Dry Day: मुंबई, पुण्यासह राज्यात सर्व २९ महापालिका क्षेत्रात १३ ते १६ जानेवारी या चार दिवस 'ड्राय डे'
20
"भाजपच्या बुलडोझरला न घाबरता आमचा कार्यकर्ता निर्धाराने उभा, काँग्रेसचाच झेंडा फडकणार"
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात सत्तेचा सोहळा; २५८४ उमेदवारांकडून २४९ कोटींचा खर्च..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 15:21 IST

पाच शहरांत ३९६ जागांसाठी २,५८४ उमेदवार मैदानात

सोमनाथ खताळ/ जालना : मराठवाड्यातील सत्तेचे राजकारण सध्या 'हायव्होल्टेज' वळणावर आहे. आठपैकी पाच महत्त्वाच्या शहरांमध्ये महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजला असून, केवळ प्रचाराचा धुरळाच नाही तर पैशांचा महापूरही वाहताना दिसत आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, नांदेड आणि परभणी या पाच शहरांतील ३९६ जागांसाठी तब्बल २ हजार ५८४ उमेदवार नशीब आजमावत आहेत. निवडणूक आयोगाच्या खर्चाच्या मर्यादेचा विचार केला, तरी या निवडणुकीत किमान २४९ कोटी ७४ लाख रुपयांची अधिकृत उधळपट्टी होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

महापालिकांचे वर्गीकरण आणि खर्चाचे गणित

निवडणूक आयोगाने महापालिकांच्या वर्गवारीनुसार खर्चाची मर्यादा निश्चित केली आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर ही एकमेव 'क' वर्ग महापालिका असून, तेथील उमेदवाराला ११ लाख रुपयांपर्यंत खर्च करण्याची मुभा आहे. उर्वरित जालना, लातूर, नांदेड आणि परभणी या 'ड' वर्ग महापालिका असून येथे ९ लाख रुपयांची मर्यादा आहे. अर्ज भरल्यापासून ते निकालापर्यंतचा हा हिशोब कोट्यवधींच्या घरात जात आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक चुरसमराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक ८५९ उमेदवार मैदानात आहेत. येथील ११५ जागांसाठी होणारा खर्च ९४ कोटींच्या पार जाण्याची शक्यता आहे. तर नव्याने स्थापन झालेल्या जालना महानगरपालिकेतही पहिल्याच निवडणुकीत ४० कोटींहून अधिक रुपयांची अधिकृत उधळपट्टी अपेक्षित आहे.

आयोगाची नजर, तरीही छुप्या खर्चाचा जोर

निवडणूक आयोगाच्या भरारी पथकांकडून ठिकठिकाणी तपासणी सुरू असून, आतापर्यंत कोट्यवधींची रोकड जप्त करण्यात आली आहे. आयोगाच्या मर्यादेपेक्षा कितीतरी पटीने जास्त 'अघोषित' खर्च निवडणुकीत होतो, हे उघड गुपित आहे. अधिकृत खर्चाचा हिशोब लावला, तर २४९ कोटींचा होत आहे. परंतु, 'इतर' खर्चाचे गणित लावले तर तो दुप्पट, तिप्पट वाढू शकतो, असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.

अशी आहे खर्च मर्यादा

वर्ग - खर्च मर्यादा

अ वर्ग - १५ लाखब वर्ग - १३ लाखक वर्ग - ११ लाख

ड वर्ग - ९ लाख

अशी आहे आकडेवारी

महापालिका - प्रभाग - सदस्य - उमेदवार - रक्कम

छत्रपती संभाजीनगर - २० - ११५ - ८५९ - ९४ कोटी ४९ लाखजालना - १६ - ६५ - ४५४ - ४० कोटी ८६ लाखलातूर - १८ - ७० - ३६९ - ३३ कोटी २१ लाखनांदेड - २० - ८१ - ४९१ - ४४ कोटी १९ लाखपरभणी - १६ - ६५ - ४११ - ३६ कोटी ९९ लाखएकूण - ९० - ३९६ - २५८४ - २४९ कोटी ७४ लाख 

English
हिंदी सारांश
Web Title : Marathwada Elections: Candidates Spend ₹249 Crore in Power Battle

Web Summary : Marathwada's municipal elections see intense competition. 2584 candidates vie for 396 seats across five cities, potentially spending ₹249.74 crore officially. Unofficial spending is expected to be much higher, exceeding official limits set by the election commission, especially in cities like Sambhajinagar and Jalna.
टॅग्स :Jalna Municipal Corporation Electionजालना महानगरपालिका निवडणूक २०२६Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation Electionछत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक २०२६Parbhani Municipal Corporation Electionपरभणी महानगरपालिका निवडणूक २०२६