शहरं
Join us  
Trending Stories
1
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
3
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
4
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
5
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य तिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
6
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
7
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
8
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
9
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
10
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
12
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
13
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
14
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
15
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
16
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
17
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
18
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
19
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
20
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी

मराठा आरक्षण हेच आता माझ्यावरील उपचार: मनोज जरांगे पाटील, वैद्यकीय पथकाला परत पाठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2023 05:32 IST

आमरण उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी शासन, प्रशासन पातळीवरून कोणी संवाद साधला नसल्याचे सांगण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्क, अंतरवाली सराटी (जि. जालना) : अंतरवाली सराटी येथील मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिला. मराठा आरक्षण हेच माझ्यावरील उपचार आहेत, असे सांगत वैद्यकीय पथकाला परत पाठविले. आमरण उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी शासन, प्रशासन पातळीवरून कोणी संवाद साधला नसल्याचे सांगण्यात आले.

महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला ५० टक्क्यांच्या आत ओबीसीतून कुणबी प्रमाणपत्र द्यावे, या मागणीसाठी शासनाला दिलेला ४० दिवसांचा कालावधी संपला. यामुळे जरांगे पाटील यांनी बुधवारी पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आहे. राज्यात ठिकठिकाणीही साखळी उपोषण केले जात आहे.

उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी जिल्ह्यासह मराठवाड्यातील विविध भागांतील युवक अंतरवाली सराटी गावात येऊन जरांगे पाटील यांची भेट घेत होते. जरांगे यांची तपासणी करण्यासाठी वडीगोद्री येथील डाॅ. शीतल कुटे व आरोग्य कर्मचाऱ्यांची टीम आली होती. परंतु, जरांगे पाटील यांनी उपचार घेण्यास नकार दिला.

तोडफोडीचे समर्थन नाही 

आमचे आंदोलन शांततेत सुरू आहे. आपण तोडफोडीचे समर्थन करीत नाही. गुणरत्न सदावर्ते यांच्या टीकेला आपण उत्तर देणार नाही, असे सांगत मराठा आरक्षणासाठी आपण  उपचारही घेणार नसल्याचा पुनरुच्चार जरांगे पाटील यांनी केला.

आरक्षणाच्या मागणीसाठी  तिघांनी संपविले जीवन

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आता समाजातील तरुण टोकाचे पाऊल उचलू लागले आहेत. गुरुवारी मराठवाड्यात तिघांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली टेंभी (ता. घनसावंगी) येथील शिवाजी अण्णाकिसन माने (४५) यांनी गुरुवारी सकाळी घरामध्येच गळफास घेऊन आत्महत्या केली. अंतरवाली टेंभी येथील साखळी उपोषणात ते सहभागी झाले होते. नंतर ते घरी गेले आणि दरवाजाच्या कोंड्याला रुमाल बांधून गळफास घेतला.   

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आपतगाव येथे गणेश काकासाहेब कुबेर (२८) या तरुणाने गुरुवारी दुपारी गळफास घेत मृत्युला कवटाळले. आत्महत्येपूर्वी त्यांनी शालेय पाटीवर ‘मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत माझा मृतदेह जाळू नका’, असा मजकूर त्याने लिहून ठेवला होता.  हिंगोली जिल्ह्यात देवजना येथील कृष्णा ऊर्फ लहू यशवंतराव कल्याणकर (२५) या तरुणाने बाभळीच्या झाडाला दोरीने गळफास घेतला. ‘मी मराठा आरक्षणामुळे जीव देत आहे’ अशा आशयाची चिठ्ठी त्याच्या खिशात आढळली.

 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील