शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 12:10 IST

29 ऑगस्टपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास मुंबईत बेमुदत उपोषण – मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

वडीगोद्री (जालना): मराठा आरक्षणासाठी लढणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, 28 ऑगस्टपर्यंत त्यांच्या 8 ते 9 प्रमुख मागण्या मान्य न झाल्यास ते 29 ऑगस्ट रोजी मुंबईत जाऊन आमरण उपोषण सुरू करणार आहेत. यासोबतच, अंतरवाली सराटीत चालू असलेले उपोषणही कायम राहणार आहे.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जरांगे पाटील म्हटले की, "मी मुंबईला जाताना विजयाचा आणि अंत्ययात्रेचा असे दोन रथ घेऊन जाणार आहे. हे केवळ आंदोलन नाही, तर मराठा समाजाच्या आत्मसन्मानाची लढाई आहे." जरांगे पाटील यांनी सरकारकडे मागणी केली की, “मराठा आणि कुणबी एकच आहेत” असा आद्यादेश तातडीने काढावा. 58 लाख नोंदींचे पुरावे देऊनही आरक्षणाचा कायदा केला गेलेला नाही. मागील दोन वर्षांपासून संयम पाळला जात आहे. अनेक मागण्या प्रलंबित असून संबंधित अधिकाऱ्यांचा जातीय दृष्टिकोन आड येतोय, असा आरोप त्यांनी केला.

अशा आहेत प्रमुख मागण्या:- मराठा-कुणबी एक असल्याचा आद्यादेश त्वरित काढावा- 58 लाख नोंदींच्या आधारे तत्काळ प्रमाणपत्रे द्यावीत- आंदोलकांवरील सर्व संबंधित केसेस मागे घ्याव्यात- सगे सोयरे अंमलबजावणी करावी- संस्थानांच्या (हैदराबाद, औंध, सातारा, मुंबई) गॅझेट्स लागू करावेत- सर्व जाती-धर्मातील मुलींना मोफत शिक्षण मिळावे

आंदोलन शांततेतच होईल“28 ऑगस्टनंतर जर मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर माझ्या मराठा बांधवांसोबत मी मुंबईत उतरणार आणि तेथे आमरण उपोषण करणार आहे. मात्र, आंदोलन शांततेतच होईल. कुणालाही धक्का लागू नये, ही माझी अपेक्षा आहे,” असे जरांगे यांनी शेवटी स्पष्ट केले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणState Governmentराज्य सरकार