शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

मंठा तालुक्याला गारपिटीने झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 00:23 IST

तालुक्यातील सात गावांमध्ये बुधवारी रात्री झालेल्या पाऊस व गारपिटीमुळे ज्वारी, हरभरा, गहू, टरबूज, या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे

लोकमत न्यूज नेटवर्कमंठा : तालुक्यातील सात गावांमध्ये बुधवारी रात्री झालेल्या पाऊस व गारपिटीमुळे ज्वारी, हरभरा, गहू, टरबूज, या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी चिंतातुर झाले आहेत. बाधित झालेल्या गावाचा अहवाल तहसील कार्यालयाला प्राप्त झाला आहे.तालुक्यातील सात गावांमध्ये पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज तहसील कार्यालयाने वर्तवला आहे. बाधित झालेल्या गावांमध्ये केंधळी, ब्रह्मनाथ तांडा, मंठा, टोकवाडी, वाई, धोंडी पिंपळगाव या ७ गावांचा समावेश असून, अन्य गावांमध्ये पिकांचे नुकसान झाले नसल्याचा अहवाल तलाठी व कृषी सहायकांनी दिल्याची माहिती तहसील प्रशासनाने दिली.सद्य स्थितीत तालुक्यामधील गहू, हरभरा, ज्वारी, टरबूज इ. पिकांचे १४९० हेक्टरचे नुकसान झाले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना एक कोटी ७८ लाख ८०० रुपये नुकसान भरपाईची मागणी तहसील प्रशासनाकडून करण्यात आल्याची माहिती तहसील कार्यालयाचे टी.व्ही. दवणे यांनी दिली. हा पाऊस हेलस, रानमळावाडी, उंबरखेडा, पाटोदा, मंठासह अनेक गावांमध्ये झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.मंठा तालुक्यातील अनेक गावांना गारपिटीचा फटका बसला असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गारपीटग्रस्त शेतक-यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देणार असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख ए. जे. बोराडे यांनी सांगितले. त्यांनी झालेल्या नुकसानीची पाहणी करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माहिती दिली.

टॅग्स :RainपाऊसAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी