शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

मनोज जरांगे आजचा दिवस पाणी पिणार...; संभाजीराजे छत्रपतींच्या विनंतीला दिला मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2023 16:48 IST

मनोज जरांगे यांनी पुन्हा आमरण उपोषण सुरु केल्यानंतर आज माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन त्यांची भेट घेतली.

मनोज जरांगे यांनी पुन्हा आमरण उपोषण सुरु केल्यानंतर आज माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीमध्ये मी प्रामाणिकपणे येथे आलोय, काही मदत लागली, तर सांगा, असं संभाजीराजे यांनी सांगितले. तुमच्या प्रकृतीची काळजी घ्या. गरीब मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मी प्रयत्नशील, असं संभाजीराजे जरागेंना म्हणाले. 

छत्रपतींचा वंशज म्हणून ही माझी जबाबदारी आहे. मनोज जरांगेंच्या पाठीशी ठामपणे उभे राहीले पाहिजे. जरांगेंनी उपोषण करावे, पण किमान पाणी तरी प्यावे, अशी विनंती देखील संभाजीराजे यांनी यावेळी केली. संभाजीराजेंच्या या विनंतीला जरांगेंनी देखील मान दिला. यावेळी जरांगे यांनी आजचा दिवस पाणी पिऊन आपण राजेंचा शब्द मोडत नसल्याच सांगिंतलं. आज पाणी ग्रहण केलं, मात्र उद्यापासून आपण पाणीही घेणार नसल्याचं जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे. 

सरकारने आपल्याकडून ३० दिवसांचा वेळ घेतला होता. आज ४१ दिवस झाले आहेत. मात्र सरकारने यावर कसल्याही प्रकारचे पाऊल न उचलल्याने आपण स्थगित केलेल्या आमरण आणि साखळी उपोषणाचे रुपांतर आजपासून पुन्हा एकदा आमरण उपोषणात करत आहोत, असं मनोज जरांगे यांनी सांगितले. मराठा समाजाच्या आंदोलकांवरील गुन्हे दोन दिवसांत मागे घेऊ असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. मात्र चाळीस दिवस होऊनही ते मागे घेतलेले नाहीत.म्हणजेच सरकार जाणून बुजून मराठा समाजाची दिशाभूल करत आहे, असा याचा अर्थ आहे, असेही मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावे, ओबीसीतून ५० टक्क्यांच्या आतील आरक्षण मिळावे, यासाठी आपला लढा सुरू आहे. परंतु, आत्महत्या होत असतील तर त्याचा उपयोग नाही. त्यामुळे युवकांनी आत्महत्या करू नयेत. आरक्षणाच्या लढ्यात सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन केले. तसेच नेतेमंडळींना गावबंदी करा, कायदा हातात घेवू नका, असे आवाहनही त्यांनी केले. आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या १६ ते १७ युवकांच्या कुटुंबियांना अद्याप शासकीय मदत मिळालेली नाही. एकूणच आजवर एकाही आश्वासनाची पूर्तता शासनाकडून झालेली नाही. यामुळे आजपासून पुन्हा आमरण उपोषण सुरू केले जात आहे. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती