शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
2
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
5
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
6
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
7
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
8
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
9
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
10
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
11
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
12
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
13
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
14
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
15
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
16
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
17
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
18
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
19
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
20
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात

कोणाला पाडायचे, निवडायचे याचे निरोप पोहोचले; जरांगे पाटील यांचा 'लोकमत'च्या मुलाखतीत दावा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2024 07:02 IST

Manoj Jarange Patil: मराठा आरक्षण, राजकारण, विधानसभा निवडणूक आणि आंदोलनाची पुढील दिशा यावर जरांगे पाटील यांनी ‘लोकमत’सोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या. 

लोकसभा निवडणुकीत अनेक मतदारसंघांमध्ये निर्णायक भूमिका बजावल्यानंतर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा विधानसभा निवडणुकीचाही गनिमी कावा ठरला आहे. समाजाचे नुकसान होऊ नये म्हणून आपण निवडणुकीतून माघार घेतली. एकट्या समाजाच्या बळावर निवडून येणे अशक्य असते. परंतु आता कोणाला पाडायचे आणि कोणाला निवडायचे हा निरोप त्या-त्या मतदारसंघात पोहोचला आहे, असा दावा जरांगे पाटील यांनी केला. अंतरवाली सराटीत ड्रॅगन फ्रूटच्या शेतात ‘लोकमत’च्या छत्रपती संभाजीनगर आवृत्तीचे संपादक नंदकिशोर पाटील यांना दिलेल्या विशेष मुलाखतीत मनोज जरांगे पाटील यांनी ही माहिती दिली.

प्रश्न: अखेरच्या क्षणी विधानसभा निवडणुकीतून माघार का घेतली?या प्रश्नावर जरांगे पाटील यांनी माघार नाही तर निर्णायक भूमिका घेतल्याचे स्पष्ट केले. एका जातीच्या आधारावर निवडणूक जिंकता येत नाही. मराठा उमेदवार पराभूत झाले असते तर त्याचा फटका आरक्षण आंदोलनाला बसला असता. राजकारण हा माझा प्रांत नाही. मला समाजासाठी लढायचे आहे. त्यांना आरक्षण मिळवून द्यायचे आहे. म्हणून मी हा निर्णय घेतला. तो मी एकट्याने घेतला नाही. मराठा समाजबांधवांशी चर्चा केली. त्यांनाही माझे म्हणणे पटले. नंतर मी हा निर्णय जाहीर केला, असे जरांगे यांनी सांगितले. प्रश्न: तुम्ही शब्द दिला म्हणून आजही अनेकजण निवडणुकीच्या रिंगणात कायम आहेत. हे का घडले? यावर जरांगे म्हणाले, ज्यांना समाजासाठी लढायचे होते. त्यांनी माझ्या आवाहनानंतर माघार घेतली. ज्यांना समाजाची मदत घेऊन फक्त आमदार व्हायचे होते ते रिंगणात कायम आहे. मराठा समाजाने राजकारणात पडूच नये. जेवणातील लोणच्याप्रमाणे राजकारण करा. आगामी दहा-बारा दिवस हे चालू द्या. नंतर आपल्या पोरा-बाळाच्या भविष्यासाठी आंदोलनात वेळ द्या. त्यांचे भविष्य उज्ज्वल करा, असा सल्ला जरांगे पाटील यांनी मराठा समाजबांधवांना दिला.प्रश्न: तुमच्या आंदोलनामुळे समाजा-समाजात तेढ निर्माण झाली असे वाटत नाही का?या प्रश्नावर जरांगे म्हणाले, मला बदनाम करण्यासाठी असा आरोप केला जातो. परंतु वस्तुस्थिती तशी नाही. आजही आम्ही सर्वजण एकच आहोत. आमच्यात कसलेही मतभेद नाहीत. उलट जे असा प्रयत्न करत आहेत, त्यांच्याच मागे समाज नाही. प्रश्न: शरद पवारांचा फोन येतो का?१३ महिन्यांपासून मी फोन वापरणे बंद केले आहे. मग मला फोन कसा येईल? माझ्या मराठा समाजबांधवांसाठी मी माझ्या डोक्याने चालतो. कोण म्हणतो रिमोट पवारांचा, कोण म्हणतो शिंदेंचा? रिमोट माझ्याच हातात असून बदनामीसाठी सोयीने ही नावे घेतली जातात, असे जरांगे म्हणाले.प्रश्न: ५७ लाख लोकांना कुणबी प्रमाणपत्र?आंदोलनासाठी राज्यातील ५७ लाख लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले. एका कुटुंबात पाच असे गृहीत धरले तर जवळपास तीन कोटी लोकांना आरक्षणाचा फायदा झाला.  रोज पाच-दहा मराठा तरुण मला नोकरी लागली असे सांगायला येतात. हे यश मराठा समाजाच्या एकजुटीचे आहे. स्वार्थासाठी या समाजाचा मी कधीच विश्वासघात करणार नसल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले.प्रश्न: लाखोंच्या संख्येने येणाऱ्या मराठा बांधवांसाठी लाखोंचा खर्च करतो कोण? या प्रश्नावर जरांगे म्हणाले, ‘आता वडीगोद्रीला जायचे म्हटले तर माझ्या खिशात दहा रुपये नाहीत. पैसा लागतो कशाला? कोटींच्या संख्येने समाज माझ्या पाठीशी आहे. स्वयंस्फूर्तीने ते खर्च करतात. मला एक रुपयासाठी कधी हात पसरावा लागला नाही. वर्गणी गोळा करून ते खर्च करतात आणि हाच समाज माझी ताकद आहे.’

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणmarathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक