शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
2
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
3
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
4
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
5
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
6
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
7
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
8
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
9
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
10
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
11
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
12
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
13
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
14
‘प्रत्येक विधानसभेत ५०,००० मतं कापण्याचा कट’, अखिलेश यादवांचे भाजपा, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप  
15
हेडचे टी-२० स्टाईल शतक, पहिल्या ॲशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सनसनाटी विजय
16
मुझम्मिलने ५ लाख रुपयांना AK-47 खरेदी केली, डीप फ्रीजरमध्ये ठेवली स्फोटके; धक्कादायक खुलासे
17
मुक्ता बर्वे ४६ व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, "आधी स्थळं यायची अन् आताही येतात पण..."
18
Video - मेलेलं झुरळ, वर कीटकांची पावडर... कॉकरोच कॉफी तुफान व्हायरल, जाणून घ्या किंमत
19
जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं ट्रॅविस हेडची ‘तोडफोड’ सेंच्युरी! असा पराक्रम करणारा ठरला जगतातील पहिला फलंदाज
20
टीव्हीवर तुफान गाजलेली विनोदी मालिका, 'भाभीजी घर पर है' आता मोठ्या पडद्यावर करणार धमाल
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यात युतीच्या डावात जुनेच पत्ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 17:23 IST

गेल्या निवडणुकीत भाजप तीन आणि शिवसेना एक असे युतीचे उमेदवार विजयी झाले होते

ठळक मुद्देयुतीकडून कुठलाच उमेदवार बदला नाही

- संजय देशमुख जालना : जालना जिल्ह्यातील युतीच्या उमेदवारांची घोषणा आता जवळपास निश्चित झाली. युतीकडून कुठलाच उमेदवार बदलण्याची हिंमत दाखवली नसल्याने युतीच्या डावात जुनेच पत्ते असे याचे विश्लेषण करता येईल. गेल्या निवडणुकीत भाजप तीन आणि शिवसेना एक असे युतीचे उमेदवार विजयी झाले होते, विशेष म्हणजे गेल्या निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती नव्हती. केवळ घनसावंगी मतदारसंघातून आ. राजेश टोपे यांनी घडाळ्याची टिकटिक कायम ठेवली होती. 

जालना जिल्ह्यात एकूण पाच विधानसभा मतदारसंघ आहेत. यात आजघडीला जालन्यातून शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांच्या रूपाने एकमेव आमदार आहेत, तर भाजपचे तीन आमदार आहेत. त्यात पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, हे परतूर विधानसभेचे नेतृत्व करतात. बदनापूर हा राखीव मतदारसंघ असून, त्यातून  भाजपचे आ. नारायण कुचे तर भोकरदन मतदारसंघातून केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा मुलगा संतोष दानवे हे आमदार आहेत. एकूणच तीन भाजप, एक शिवसेना आणि एक राष्ट्रवादी असे गेल्या निवडणुकीतील चित्र आहे. यंदा भाजपने आपली यादी जाहीर करताना ती सर्वात शेवटी केली आहे. तत्पूर्वी शिवसेनेच्या वाट्याला असलेल्या जालना आणि घनसावंगी येथील उमेदवारांना खुद्द पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे यांनी मुंबईत ए.बी. अर्ज दिले होते.

दरम्यान, पुन्हा एकदा जुन्याच लढती कायम राहतील असे चित्र दिसत आहे. जालन्यात काँग्रेसकडून माजी आ. कैलास गोरंट्याल यांच्याविरूध्द खोतकर, परतूरमध्ये लोणीकरांविरूध्द माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, भोकरदनमध्ये भाजपचे संतोष दानवेंविरूध्द राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आ. चंद्रकांत दानवे तसेच घनसांवगी मतदारसंघात आ. राजेश टोपे यांच्याविरूध्द शिवसेनेकडून निवृत्त उपजिल्हाधिकारी डॉ. हिकमत उढाण यांच्यात लढत होईल. बदनापूर मतदारसंघात आ. कुचेंविरूध्द राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणाला उमेदवारी मिळते याकडे लक्ष लागून आहे.  बदनापूर मतदारसंघ शिवसेनेकडे सोडावा, या मागणीसाठी माजी आ. संतोष दानवे यांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे हट्ट धरला होता आणि ठाकरे यांनीही बराच उचलून धरला परंतु ऐनवेळी यात बदल शक्य झाला नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, आता संतोष सांबरे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. यंदा वंचित, एमआयएमकडे लक्ष यंदाच्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमचे उमेदवार किती प्रभाव पाडतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आहे. वंचित आघाडीने आपले पाचही उमेदवार जाहीर केले आहेत. तसेच जालन्यातील एमआयएमचे उमेदवारही यापूर्वीच घोषित केले आहेत. त्यामुळे प्रचारातील रंगत आता चांगली वाढणार आहे. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाShiv Senaशिवसेना