शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
4
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
5
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
6
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
7
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
8
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
9
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
10
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
11
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
12
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
13
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
14
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
15
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
16
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
17
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
18
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
19
मृणाल ठाकूरच नाही धनुषचं 'या' अभिनेत्रींसोबतही जोडलं होतं नाव, एक तर सुपरस्टारची लेक
20
Asia Cup 2025 : 'विराट' स्वप्न साकार करणाऱ्या या भिडूवर गंभीर भरवसा दाखवणार?

मोसंबी उत्पादकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 01:08 IST

जालना तालुक्यातील बहुतांश गावात मोसंबी आंबे बहराची फळगळ मोठ्या प्रमणात झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्करामनगर : जालना तालुक्यातील बहुतांश गावात मोसंबी आंबे बहराची फळगळ मोठ्या प्रमणात झाली आहे. यामुळे मोसंबी उत्पादनात मोठी घट होणार असून मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.तालुक्यातील फळधारणाक्षम मोसंबी अवघी साडेतीन हजार हेक्टरच्या आसपास आहे. खरीपाचा समजला जाणारा आंबे बहरावर यावर्षी दुष्काळाचे मोठे संकट होते. यामुळे मोठ्या प्रयत्नाने डिसेंबर- जानेवारी महिन्यात शेतकऱ्यांनी हजारो रूपये खर्च करून मोसंबी आंबे बहराची फूट काढून अतिशय काळजी घेत झाडावर फळधारणा केली. परंतु, मार्च- एप्रिल महिन्यात बदलत्या वातावरणामुळे बोरा एवढ्या आकाराच्या मोसंबीच्या फळांची बहुतांश बागांमध्ये गळ झाली आहे.तालुक्यात फळपिकांमध्ये एकमेव मोसंबी हे असे फळपीक आहे की, इतर फळपिकांच्या तुलनेत सोपे आहे. द्राक्ष, डाळींब यापेक्षाही मोसंबी चांगली म्हणणारा शेतकरी वर्ग आजही आहे. जालना जिल्ह्यात मोसंबीसाठी असणारे अनुकूल वातावरण वर्षानुवर्ष बदलत चालले असल्याचे आंबा उत्पादक सांगतात. गेल्या सात- आठ वर्षापासून सातत्याने पडणा-या दुष्काळामुळे मोसंबी उत्पादकांच्या हाती एरव्ही फार काही लागले नाही. प्रत्येक वर्षी तोच पाढा यावर्षी काहीही होवो; झाडे वाचली म्हणजे झालं. अशी झाडं वाचविता- वाचविता अनेकांच्या बागा नष्ट झाल्या. एकेकाळी तालुक्यात १० हेक्टरच्या आसपास मोसंबी होती. आता ती अवघी तीन ते साडेतीन हजार हेक्टरवर आली. एरव्ही वृक्ष लागवडीसाठी शासनस्तरावरून लाखो रूपये खर्च केले जातात. २० ते २५ वर्ष मोसंबी वृक्षाचे जतन करणा-या उत्पादकाला काय, असा सवालही मोसंबी उत्पादकांमधून विचारला जात आहे. तालुक्यातील फळगळतीची पाहणी करून फळपीक विमा तातडीने द्यावा, अशी मागणीही मोसंबी उत्पादकांमधून होत आहे.मोसंबीचा जिल्हा म्हणून जालन्याची महाराष्ट्रात ओळख आहे. परंतु, गेल्या कित्येक वर्षांपासून जिल्ह्यातील मोसंबी खºया अर्थाने शाश्वत उत्पन्न देणारी ठरावी, यासाठी संबंधित विभागाकडून कुठल्याच ठोस उपाय- योजना केल्या जात नसल्याचे मोसंबी उत्पादक संघाचे अध्यक्ष भगवान डोंगरे यांनी सांगितले.निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्यामुळे कृषी विभागाकडे मोसंबी उत्पादकांच्या समस्या सोडविण्यास सध्या तरी पुरता वेळ नसल्याचे दिसून येत आहे. यावर्षी पडलेल्या दुष्काळामुळे आंबे बहराच्या मोसंबीचे जतन करणे, जिकिरीचे होतेच. परंतु, पुढील वर्षी या मोसंबीस ३० ते ४० हजार रूपये प्रति टन भाव मिळणारच, असे खुद्द व्यापा-यांसह मोसंबी उत्पादक सांगत आहेत.

टॅग्स :fruitsफळेAgriculture Sectorशेती क्षेत्रweatherहवामान