Lok Sabha Election 2019 : दानवेंचा पराभव करणे हेच पहिले लक्ष्य : बच्चु कडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 04:33 PM2019-03-23T16:33:45+5:302019-03-23T16:36:24+5:30

खोतकरांनी दिलेला शब्द पाळला नाही

Lok Sabha Election 2019: The first goal is to defeating Danave : Bachhu Kadu | Lok Sabha Election 2019 : दानवेंचा पराभव करणे हेच पहिले लक्ष्य : बच्चु कडू

Lok Sabha Election 2019 : दानवेंचा पराभव करणे हेच पहिले लक्ष्य : बच्चु कडू

Next

जालना : शेतकऱ्यांना साले म्हणणाऱ्या भाजपा प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांना खाली खेचण्यासाठी तयार रहा, त्यांचा पराभव करणे हेच पहिले लक्ष्य असल्याचा पुनरुच्चार आ. बच्चु कडू यांनी केला. ते शनिवारी (दि. २३) जालना येथे आयोजीत कार्यकता संवाद बैठकीत बोलत होते. 

यावेळी स्वाभिमानी शेतकरी, शेतकरी संघटना, आणि प्रहार शेतकरी संघटनेचे कार्यकर्त्याची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. शेतकऱ्यांच्या हितासाठी तुम्ही खासदारकीला उभे राहिलेच पाहिजे अशी विनवणी कार्यकर्त्यांनी केली. यावेळी आ. कडू म्हणाले, मी निवडणूक लढवावी अशी  तीव्र भावना कार्यकर्त्यांची आहे, याच भावना कायम ठेवून शेतकऱ्यांविषयी अपशब्द बोलणाऱ्या दानवेंना कसे पाडता येईल यावर कार्यकर्त्यांनी लक्ष द्यावे. मी निवडणुकीस उभा राहो अथवा न राहो दानवेंना पाडण्यासाठी सज्ज रहा असे आवाहन आ. कडू यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले. 

खोतकरांनी दगा दिला  
माझा निर्णय मी २८ तारखेला जाहीर करेल असे आ. कडू यांनी जाहीर केले. तसेच राज्यमंत्री खोतकरांचा समाचार घेत त्यांनी मला दगा दिल्याचे कडू म्हणाले. मी दानवेंच्या विरोधात लढणार असा शब्द मला खोतकरांनी दिला होता पण त्यांनी तो पाळला नाही असेही ते म्हणाले. 

Web Title: Lok Sabha Election 2019: The first goal is to defeating Danave : Bachhu Kadu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.