शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

काळजीपूर्वक 'ऐका', कायमचे बहिरेपण येण्याच्या प्रमाणात २५ टक्क्यांनी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 19:02 IST

श्रवणदोष यंत्र मागणीत वाढ, लहान मुलांची बेरा ऑडिओमेट्रीची चाचणी करण्याकडे पालकांचा कल

जालना : प्रसिद्ध गायिका अलका याज्ञिक यांना ऐकू येणे बंद झाल्याचे नुकतेच समोर आले आहे. अशाच प्रकाराची श्रवण क्षमता कमी झाल्याचे अनेक रुग्ण जिल्ह्यात आढळून येत आहेत. जिल्ह्यात मागील तीन वर्षांतील श्रवणदोष तपासणीची आकडेवारी बघता तपासणीसाठी आलेल्या २५ टक्के रुग्णांमध्ये कायमचे बहिरेपणा येण्याच्या प्रमाणात वाढ झाली असल्याची रुग्णालय प्रशासनाकडून दिलेल्या आकडेवारीवरून उघड झाले आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालयात मराठवाड्यातील पहिले अत्याधुनिक श्रवणदोष तपासणी केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. या माध्यमातून आजपर्यंत हजारो रुग्णांची श्रवणदोष तपासणी करण्यात आली आहे. वयोवृद्धपणामुळे ज्येष्ठांमध्ये श्रवणक्षमता कमी होते. मात्र, हल्ली डोक्याला गंभीर दुखापत होणे, तासनतास कानात हेडसेट लावून तीव्र आवाजात गाणी ऐकणे, गेम खेळणे, डिजे लावून गाणी ऐकणे, तसेच नेहमी कर्णकर्कश आवाजाच्या सान्निध्यात राहणे, अशा गोष्टीमुळे कानाच्या आतील नाजूक पडद्यांच्या नसा फाटतात. यामुळे कमी वयातील व्यक्तीमध्येदेखील श्रवणदोष आजाराचे प्रमाण वाढत आहे.

सन २०२० ते २०२४ दरम्यान करण्यात आलेली श्रवणदोष तपासणीमार्च २०२० ते एप्रिल २०२१ - १४४५२०२१ ते २०२२ - १७५० २०२२ ते २०२३- १८८०२०२३-२०२४ - ११५

बाळाच्या बेरा चाचणीकडे कलहल्ली मुले जन्माला आल्यानंतर काही तासांच्या अंतराने किंवा महिन्यातच त्या बाळाची आयक्यु लेवल तपासणी करण्याची मागणी वाढत आहे. ही चाचणी बाळ जन्मल्यानंतर केली जाते. यामध्ये बाळ झोपेत असताना ही चाचणी करावी लागते, त्यामुळे बाळ जन्माने बहिरे असल्यास पुढील उपचार करणे सोपे होते. पालकांकडून बाळाची बेरा चाचणी करण्याची मागणी वाढली आहे.

डॉक्टरांशी संपर्क साधावाजिल्ह्यातीलच नव्हे, तर मराठवाड्यातील अत्याधुनिक असे श्रवणदोष तपासणी केंद्र जालना येथील जिल्हा रुग्णालयात उपलब्ध आहे. त्याद्वारे रुग्णांची श्रवणदोष तपासणी करून योग्य उपचार करणे सहज शक्य आहे. कमी ऐकू येत असल्याची लक्षणे दिसून आल्यास तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा.- डॉ. प्रियंका शिंदे, ऑडिओमेट्री विभाग, जालना.

उपचार शक्यलहान मुलांची बेरा चाचणी करण्यासाठी पालक स्वत:हून आमच्याकडे येत आहेत, कारण कमी वयात बाळाची श्रवण चाचणी झाली आणि त्यात बालकास श्रवणदोष आढळल्यास पुढील महागडे उपचार अगदी स्वस्तात करणे शक्य होते.- डॉ. कीर्ती कराडकर, कान, नाक, घसा तज्ज्ञ विभाग, जालना.

टॅग्स :Healthआरोग्यJalanaजालना