शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
4
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
5
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
6
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
7
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
8
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
9
आयफोन १७ सिरीजमध्ये 'या' गोष्टी मिळणार नाहीत; खरेदी करत असाल तर...
10
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
11
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
12
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
13
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
14
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
15
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण
16
"त्याला उचकी आली आणि...", 'अशी ही बनवा बनवी'मधील शंतनूचं असं झालं निधन, पत्नीचा खुलासा
17
वाद-प्रतिवाद सुरू असलेल्या भारताला आज स्वीकारमंत्र अंगीकारण्याची गरज -मोरारीबापू
18
Prithvi Shaw: सपना गिल विनयभंग प्रकरणात न्यायालयाने पृथ्वी शॉला ठोठावला १०० रुपयांचा दंड!
19
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
20
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख

'झालं गेलं विसरून जाऊ'; रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यात पुन्हा दिलजमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 14:52 IST

लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांचा पराभव झाल्यानंतर खोतकर व दानवे यांच्यात मोठा राजकीय दुरावा निर्माण झाला.

- फकिरा देशमुखभोकरदन( जालना) : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर दुरावलेले माजी केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे व शिवसेनेचे नेते माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यात पुन्हा दुसऱ्यांदा दिलजमाई झाली. झाले गेले विसरून विधनसभा निवडणुकीत आपण एकमेकाचे काम करू, असे दोघांनीही पत्रकारांना सांगितले.

लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांचा पराभव झाल्यानंतर खोतकर व दानवे यांच्यात मोठा राजकीय दुरावा निर्माण झाला. विधानसभा निवडणुकीत अर्जुन खोतकर हे महायुतीचे जालन्यातून उमेदवार आहेत तर रावसाहेब दानवे यांचे चुलत भाऊ भास्करराव दानवे यांनीही येथून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, दानवे यांनी अर्ज मागे घेतला. परंतु, जालन्यात भाजपचे कोणतेही कार्यकर्ते खोतकर यांच्या प्रचारात सक्रिय नसल्याने खोतकर अडचणीत सापडले आहेत. त्यातच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जालन्यात प्रचार सभा आहे. सभेसाठी आपण यावे म्हणून अर्जुन खोतकर व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर यांनी आज सकाळी ७ वाजता रावसाहेब दानवे यांचे भोकरदन येथील निवस्थान गाठले. मात्र, दानवे प्रचारासाठी ग्रामीण भागात गेले होते. खोतकर यांनी दानवे यांना फोन करून आपण घरी आलो आहोत, असा निरोप दिला. त्यानंतर दानवे घरी आले.

दानवे - खोतकर तब्बल २ तास चर्चादरम्यान, खोतकर आणि दानवे यांच्यात तब्बल दोन तास खलबत्ते झाली. त्यामध्ये मागच्या अनेक चुकावर प्रकाश टाकण्यात आला. आता आपण झाले गेले विसरून पुढे काही चुका होणार नाही असा शब्द दानवे आणि खोतकरांनी एकमेकांना दिला. पुन्हा महायुतीचा सुखाने संसार करण्याचा निर्णय घेतला. यावेळी शिवसेना शिंदे यांचे पदाधिकारी विशाल गाढे, भुषण शर्मा, यांची उपस्थिती होती.

रावसाहेब दानवे यांनी आशीर्वाद दिलामाजी राज्यमंत्री तथा जालना मतदार संघातील महायुतीचे उमेदवार अर्जुन खोतकर यांनी सांगितले की, मी जालन्यातुन महायुतीचा उमेदवार आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जालना येथे सभा आहे. त्याचे निमंत्रण देण्यासाठी व दानवे यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आज येथे आलो. दानवे यांनी मला आशीर्वाद दिला आहे, ते माझ्या प्रचारासाठी येणार आहेत. मागच्या काळात जे काही मतभेद होते, गैरसमज होते ते दूर झाले आहेत. यापुढे आमच्यात कोणताही दुरावा निर्माण होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ, आमचे कार्यकर्ते सुध्दा भोकरदन मतदार संघात संतोष दानवे यांना निवडून आणण्यासाठी परिश्रम घेतील असे खोतकर यांनी सांगितले.

जुन्या वादावर पडदामाजी केंद्रिय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले की, मी राज्य पातळीवर काम करणारा नेता आहे. आतापर्यंत राज्यात अनेक ठिकाणी जाऊन महायुतीसाठी सभा घेतल्या. त्यामुळे जालन्यात जाता आले नाही. मी पक्षशिस्त पाळणारा, त्यामुळे खोतकर आले नसते तरीही मी महायुतीचा प्रचार करणार होतो. मात्र अर्जुनराव खोतकर घरी आले. आमच्यात चर्चा झाली, मागे काय झाले यावर पडदा टाकून पुढे एकत्र काम करण्याचे ठरले आहे. मी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेसाठी जाणार आहे.  माझा लोकसभेत जो पराभव मान्य करून परत कामाला लागलो आहे. मी खचून जाणारा कार्यकर्ता नाही असे दानवे यांनी सांगितले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकbhokardan-acभोकरदनjalna-acजालनाArjun Khotkarअर्जुन खोतकरraosaheb danveरावसाहेब दानवे