शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
2
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
3
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
4
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
5
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
6
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
7
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
8
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
9
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
10
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
11
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
12
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
13
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
14
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
15
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
16
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
17
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
18
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
19
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
20
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात

लीळाचरित्र ग्रंथ आदर्शवादी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 12:46 AM

महानुभावांचाच नव्हे, तर मानवतवादी तत्वज्ञानाचा कुठला ग्रंथ असेल तर तो लीळाचरित्र ग्रंथ आहे. हा ग्रंथ आदर्शवादी आहे. असा हितोपदेश महंत सुरेशराज राहेरकर यांनी दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमहदंबा नगरी : महानुभावांचाच नव्हे, तर मानवतवादी तत्वज्ञानाचा कुठला ग्रंथ असेल तर तो लीळाचरित्र ग्रंथ आहे. यामध्ये संस्कार, तत्वविचार दिसतात. यामुळे आज संपत्तीच्या पाठीमागे लागलेल्यांसाठी हा ग्रंथ आदर्शवादी आहे. असा हितोपदेश महंत सुरेशराज राहेरकर यांनी दिला आहे.येथील बगडिया इंटरनॅशनल मध्ये आयोजित अखिल भारतीय महानुभाव साहित्य संमेलनातील तीसऱ्या परिसंवादात सोमवारी लीळाचरित्र- संस्कार दर्शन या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर डॉ. राजधर सोनपेठकर, डॉ. संदीप तडस, कुलाचार्य लासूरकर महाराज, आचार्य सेवलीकर महाराज, कोठीकर महाराज आदींची उपस्थिती होती.पुढे बोलताना राहेरकर महाराज म्हणाले, १२ शतकात वनस्तपतीचा एकत्र रसायन प्रक्रियेतून सोनं कसं तयार करायचे याची प्रक्रिया या ग्रंथात आली आहे. अन्याय अत्याचाºयाच्या घटना आज आपल्या सर्वांच्याच बाजूला घडत आहेत. आजच्या शिक्षण व्यवस्थेने माणूस सुशिक्षित होत आहे. पण, तो सुसंस्कृत होती की नाही. ही महत्त्वाची बाब आहे.वाल्या कोळ्या बदलल्याच्या आजपर्यंत आपण इतिहास ऐकत होतोत. पण, या राज्याने हा इतिहास डोळ््याने पाहिला आहे की, नागदेवाचार्यासारखा दरोडेखोर माणूस आरपार बदलला आहे. स्वामींच्या सुसंस्काराने आज तो आपल्याला लीळाचरित्र ग्रंथात दिसत आहे. तसेच माणूस अहंकाराने दूर जातो. पण, त्याला जागेवर आणण्याचे काम स्वामिंनी केले असून त्यांनी माणसांवरच नाही तर प्राण्यांवरही प्रेम केले असल्याचेही महंत सुरेशराज राहेरकर यांनी सांगितले आहे.स्मृतीस्थळ या विषयावर बोलताना संदीप तडस म्हणाले, महानुभाव साहित्यातून मराठी भाषेचा उगम झालेला असून महानुभाव साहित्य मराठी भाषेची जननी व उगमस्थान आहे. यामुळे प्रत्येकाने एकदा तरी हा स्मृतीस्थळ हा ग्रंथ वाचावा, या ग्रंथाची भाषा साधी, सोपी व घरगुती आहे. परंतु, ती तेवढीच आत्मकल्याणाची आहे.आज ख-या अर्थाने महानुभाव साहित्याचे संशोधन होण्याची गरज आहे. पण, आपल्याकडे खेकडे प्रवृत्ती असल्याने चळवळ निर्माण करायला गेले की मागे पाय ओढवले जात असल्याची खंतही डॉ. संदीप तडस यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :literatureसाहित्यSocialसामाजिक