शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

शेतातून निघाले पण घरी परतलेच नाही; रस्त्यात आढळला शेतकऱ्याचा चेहरा ठेचलेला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 15:49 IST

शिराढोण शिवारात शेतकऱ्याचा खून; लाकडी ओंडक्याने चेहरा ठेचून केला विद्रूप

अंबड (जालना): शिराढोण गावच्या शिवारात एका ६० वर्षीयशेतकऱ्याचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मच्छिंद्र गंगाधर सपकाळ ( रा. शिराढोण तालुका अंबड, हल्ली मुक्काम अंबड) असे मृताचे नाव असून पोलिस पुढील तपास करत आहेत. ही घटना बुधवारी मध्यरात्री उघडकीस आली.

अंबड येथील रहिवाशी मच्छिंद्र सपकाळ यांची शिराढोण येथे शेती आहे. बुधवारी सायंकाळी ते शेतातील काम आटोपून अंबड येथील घराकडे परत निघाले. मात्र, रात्री उशीर झाला तरीही ते घरी परतले नाही. यामुळे नातेवाइकांनी त्यांचा लागलीच शोध सुरू केला. अंबड ते शिराढोणकडे मार्गावर शोध घेत असताना नातेवाइकांना रात्री उशिरा शिराढोण शिवारातील पाणंद रस्त्यावर सपकाळ यांचा मृतदेह आढळून आला. सपकाळ यांचा चेहरा लाकडी ओंडक्याच्या सहाय्याने ठेचल्याचे निदर्शनास आले. 

माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे, पोलीस निरीक्षक सतीश जाधव, पोलीस उपनिरीक्षक गुरले, नरोडे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला. या प्रकरणी मृताच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सतीश जाधव करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालना