शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

दरोडेखोरांचा म्होरक्या राजकीय कार्यकर्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 00:40 IST

औद्योगिक वसाहतीमधील दरोडा प्रकरणात गुन्हे शाखेने ताब्यात घेतलेल्या टोळीचा म्होरक्या मोहंमद इम्रान नियाजोद्दीन हा मुंब्रा भागातील एका बड्या राजकीय नेत्याचा जवळचा कार्यकर्ता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील औद्योगिक वसाहतीमधील दरोडा प्रकरणात गुन्हे शाखेने ताब्यात घेतलेल्या टोळीचा म्होरक्या मोहंमद इम्रान नियाजोद्दीन हा मुंब्रा भागातील एका बड्या राजकीय नेत्याचा जवळचा कार्यकर्ता आहे. ट्रॉन्सपोर्टचे काम करताना कुठला माल कुठे जातो याची माहिती घेऊन परिसराची रेकी करून चोरी करण्याची या टोळीची कार्यपद्धती आहे.मुंबईतील मुंब्रा भागात तीन ते चार गुन्हेगारी टोळ्या सक्रिय आहेत. जालना औद्योगिक वसाहतीमध्ये दरोडा टाकणाऱ्या टोळीचा मोहंमद इम्रान नियाजोद्दीन हा म्होरक्या असून, त्याचा मुंब्य्रातील राजकीय वर्तुळात वावर आहे. ट्रॉन्सपोर्ट व्यवसायाशी निगडित कामामुळे कुठला माल कोणत्या भागात जाणार याचीही माहिती त्याला अनेकदा मिळत असे. चोरी झालेल्या कंपन्यांमध्ये ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीसाठी लागणारे महागडी कॉपर तार, पितळ व अन्य साहित्य असल्याची माहिती मोहंमद इम्रान याला मिळाली होती. त्याने जमीरउल्ला अन्सारी, अब्दुल सईम महंमद युनूस, असलम अली अक्रम अली, अब्दुल सलीम खान, अकबर अबीद खान (४५, इरशाम अहमेद खान व अन्य दोघांना सोबत घेतले. ‘माल उठाने के लिये जाना है’ एवढीच माहिती त्याने टोळीत साथीदारांना दिली होती.शिला व पंकज या कंपन्यांमधील सुरक्षारक्षकाला मारहाण केल्यानंतर यातील दोघांना खरा प्रकार कळला. मुद्देमाल ट्रकमध्ये घेऊन मुंबईकडे जाताना चोरट्यांनी चोरलेली दुचाकी औरंगाबाद-शिर्डी रस्त्यालगत फेकून दिली. घटनेतील ट्रकचा क्रमांक मिळालेला असल्याने स्थानिक गुन्हे शाखेने त्या दिशेने तपास सुरू केला. पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी मुंबईत एटीएसमध्ये काम केलेले असल्यामुळे त्या भागातील खब-यांकडून माहिती मिळवली.या घटनेतील संशयित मुंब्रा भागातील असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलीस व खब-यांच्या मदतीने जालना पोलिसांनी त्यातील एकाला पकडले. त्याने अन्य तिघांची नावे सांगितली. सर्वजण एकाच भागात राहत असल्याने पोलिसांनी दोन दिवसात वरील सात जणांना ताब्यात घेतले. अन्य दोन साथीदारांचा शोध सुरू आहे.चोरलेला मुद्देमाल मुंबईत विक्री करण्याचा दरोडेखोरांचा प्लॅन होता. विक्री करण्यापूर्वी चोरट्यांनी मुद्देमालाचे एका ठिकाणी वजन केले. या वजनाची पावती जालना पोलिसांच्या खब-याने पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना व्हॉसअ‍ॅपवर पाठवली. पोलीस शोधत असलेला ट्रक व या ट्रकचा क्रमांक एकच असल्याने पोलीस तपास करत ट्रक मालकापर्यंत पोहचले. चौकशीत टोळीतील एकाचे नावाची माहिती मिळाली. हाच धागा पकडून पोलिसांनी सात दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या.सराईत गुन्हेगारदरोडेखोरांच्या या टोळीत आणखी काही जणांचा सहभाग आहे. त्यांनी या पूर्वी महाराष्ट्रासह, मध्यप्रदेश व गुजरातमध्ये चोरी व दरोड्याचे गुन्हे केले आहेत. टोळीचे सदस्य पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत.

टॅग्स :crimeगुन्हेPoliticsराजकारणPoliceपोलिसArrestअटकJalanaजालना