शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

जलस्वराज्य प्रकल्पाला अखेरची घरघर; राज्यभरातील १८० कंत्राटी कर्मचाऱ्यांना नारळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 6:44 PM

राज्यातील १२ जिल्ह्यांत प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग करण्यात आला असला तरी, ३३ जिल्ह्यांत या प्रकल्पांतर्गत ग्रामलेखा व पाणी गुणवत्ता सल्लागार म्हणून कंत्राटी पदभरती करण्यात आली होती.  

ठळक मुद्देपाणी गुणवत्ता सल्लागार व ग्रामलेखा समन्वयकांना घरचा रस्ताजलस्वराज प्रकल्प गुंडाळण्याच्या हालचाली 

- दीपक ढोले 

जालना : ग्रामीण भागात भूगर्भातील स्रोतांचा शोध घेऊन त्या माध्यमातून पाण्याचा साठा वाढविणे व पाण्याची गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करण्यासाठी राज्य सरकारने पाच वर्षांसाठी सुरू केलेल्या जलस्वराज्य प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला अखेरची घरघर लागली आहे. या प्रकल्पासाठी राज्यभरात १८0 कंत्राटी कर्मचारी नेमण्यात आले होते. त्यांना शासनाने घरचा रस्ता दाखविला आहे. 

राज्यात दरवर्षी भासणाऱ्या पाणीटंचाईचा मुकाबला करण्यासाठी भूगर्भातील पाण्याच्या स्त्रोतांचा शोध घेऊन त्या माध्यमातून पाणीपुरवठा करणे, उपलब्ध असलेल्या पाण्याची गुणवत्ता तपासणी करून नागरिकांना शुद्ध पाणी पुरविणे व घरोघरी पाणी पुरविण्यासाठी राज्य सरकारने जलस्वराज्य प्रकल्प राबविला होता. राज्यातील १२ जिल्ह्यांत प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग करण्यात आला असला तरी, ३३ जिल्ह्यांत या प्रकल्पांतर्गत ग्रामलेखा व पाणी गुणवत्ता सल्लागार म्हणून कंत्राटी पदभरती करण्यात आली होती.  गेल्या पाच वर्षांपासून सदर  कर्मचाऱ्यांकडून पाण्याचे नमुने घेणे, तपासणी करणे, गावोगावच्या पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेऊन टीसीएल फवारणी करणे आदी कामे करुन घेण्यात आली. यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागात ग्रामलेखा व पाणी गुणवत्ता सल्लागारांची नेमणूक करण्यात आली होती. राज्यभरात १८० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. यात ११२ पाणी गुणवत्ता सल्लागार व ६८ ग्रामलेखा समन्वयकांचा समावेश आहे; परंतु आता शासनाने सदरील १८० कर्मचाऱ्यांना नुकताच घरचा रस्ता दाखवला आहे. 

जलस्वराज्य प्रकल्प गुंडाळण्याच्या हालचाली प्रकल्पासाठी राज्य सरकारला जागतिक बँकेकडून वित्तपुरवठा करण्यात आला असल्याने आता या वित्तपुरवठ्याची मुदत संपुष्टात आली आहे. त्यामुळे जलस्वराज्य प्रकल्प गुंडाळण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून, त्यासाठी नेमण्यात आलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्तीची कार्यवाही सुरू करण्यात आली होती. प्रशासकीय पातळीवरील कामे करण्यासाठी या कर्मचाऱ्यांना सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती; परंतु मुदती संपण्यापूर्वीच शासनाकडून कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात आले. हे कर्मचारी ग्रामस्तरावर महत्त्वाचे काम करीत असताना त्यांचे समकक्ष योजनेत समायोजन करणे सोडून शासनाने घरचा रस्ता दाखविला. यात जालना जिल्ह्यातील सहा जणांचा समावेश आहे. 

मुदतवाढ द्यावी शासनाने १८० कर्मचाऱ्यांना घरी बसवले आहे. आमची नोकरी गेल्याने आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी यात लक्ष घालून इतर पदांना जशी मुदतवाढ दिली तशीच पाणी गुणवत्ता सल्लागार व ग्रामलेखा समन्वयकांना मुदतवाढ द्यावी. -स्वप्नील जाधव, अध्यक्ष, जलस्वराज्य टप्पा-२, जि. प. उपविभागीय कंत्राटी कर्मचारी संघटना

३० जूनपासून कर्मचारी घरी जलस्वराज्य प्रकल्प दुसऱ्या टप्प्यासाठी राज्यभरात पाणी गुणवत्ता सल्लागार व ग्रामलेखा समन्वयकांची नेमणूक करण्यात आली होती; परंतु सध्या शासनाने सदरील कर्मचाऱ्यांना घरी पाठविले. जालना जिल्ह्यातील ६ कर्मचाऱ्यांना ३० जूनपासून घरी बसविण्यात आले. - अनुपमा नंदवनकर, उपमुख्य कार्यकारी  अधिकारी, स्वच्छ भारत मिशन

टॅग्स :WaterपाणीJalanaजालनाState Governmentराज्य सरकार