शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

कृषी संजीवनी प्रकल्प ‘वरदान’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 1:01 AM

शेतकऱ्यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने शासनाने जागतिक बॅकेच्या साहाय्याने राज्यात २०१८ साली नानाजी देशमुख कृषी प्रकल्प सुरू केला. हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी ‘वरदान’ ठरत असून, दोन वर्षात २६३६ लाभार्थ्यांना या प्रकल्पाचा लाभ मिळाला आहे

दीपक ढोले ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शेतकऱ्यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने शासनाने जागतिक बॅकेच्या साहाय्याने राज्यात २०१८ साली नानाजी देशमुख कृषी प्रकल्प सुरू केला. हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी ‘वरदान’ ठरत असून, दोन वर्षात २६३६ लाभार्थ्यांना या प्रकल्पाचा लाभ मिळाला आहे. या शेतकºयांना २० कोटी ७५ लाख रूपयांचे अनुदान वाटप करण्यात आले.गेल्या काही वर्षांपासून मराठवाडा व विदर्भातील शेतक-यांना दुष्काळास सामोरे जावे लागत असून, याचा भूगर्भातील पाणी साठ्यावर व जमिनीच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. परिणामी शेतीमधील पिकांची उत्पादकता घटत आहे. तसेच पूर्णा नदीच्या खो-यातील भू-भाग हा निसर्गत: क्षारपड असल्याने शेतीसाठी सिंचनास मर्यादा येत आहे. या प्रतिकूल परिस्थितीमध्ये अल्पभूधारक शेतकºयांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून आले. हवामान बदलामुळे उध्दभवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास, शेतक-यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने राज्यात जागतिक बँकेच्या साहाय्याने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प सुरू केला आहे.या प्रकल्पाअंतर्गत शेतक-यांना फळबाग, सामूहिक शेततळे, ठिंबक सिंचन, तुषार सिंचन, इलेक्ट्रिक मोटार, पीव्हीसी पाईप, शेडनेट, रेशीम इ. बाबींवर अनुदान देण्यात येते. जालना जिल्ह्यातही हा प्रकल्प राबविण्यात येत असून, या प्रकल्पाचा लाभ अनेक शेतकरी घेत आहेत.नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या तिस-या टप्प्यात १०८ गावांची निवड करण्यात आली. या गावात गाव समित्या स्थापन करण्याचे काम सुरू असल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले.तिसºया टप्प्यात बीबी, बोरगाव, खोलवाडी, पिंपळवाडी, सेवली, जळगाव, घाणेवाडी, गोकुळवाडी, निधोना, सारवाडी, नादापूर, देवनगर, कृष्णानगर, कोटी, देवळाई अंबड, राजेगाव, वालसावंगी, फत्तेपूर, पद्मावती, तपोवन, जयपूर, वझर सरकटे, तळेगाव, उस्वद, पांगरी इ. गावांची निवड करण्यात आली.या प्रकल्पासाठी प्रकल्प कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेषज्ञ नित्यानंद काळे, विशाल डेंगळे हे कामे करीत आहेत.उर्वरित अर्जावर पूर्वसंमतीदेण्याची प्रक्रिया सुरूनानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पासाठी ३६३ गावांमधील १ लाख ६० शेतक-यांनी अर्ज दाखल केले आहेत. यातील २१ हजार ६९९ अर्जांना पूर्वसंमती देण्यात आली असून, २६३६ लाभार्थ्यांना प्रत्यक्षात अनुदान मिळाले आहे. उर्वरित अर्जांवर गाव समित्या व कृषी विभाग काम करत असून, या अर्जांनाही तातडीने पूर्वसंमती देण्यात येणार असल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले.शेतकरी गट व महिला बचत गटाला कृषी निगडीत व्यवसायासाठी दिले जाते ६० टक्के अनुदानसामूहिक शेततळ््यासाठी १०० टक्के अनुदानफळबागेसाठी १०० टक्के अनुदानविद्युत मोटार, पीव्हीसी पाईप ७० टक्के अनुदान, ठिबक व तुषारसाठी ८० टक्के अनुदान मिळते.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पFarmerशेतकरीWorld Bankवर्ल्ड बँक