शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

...अन खोतकरांनी मैदानाचा ताबा घेतला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 00:37 IST

ज्या क्षणी पंचांनी शेवटची अर्थात महाराष्ट्र कुस्ती किताबासाठीच्या लढीची घोषणा केली अन् संयोजक तथा स्वागताध्यक्ष राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी गादी गट मैदान क्रमांक दोनचा ताबा घेतला

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : ज्या क्षणी पंचांनी शेवटची अर्थात महाराष्ट्र कुस्ती किताबासाठीच्या लढीची घोषणा केली अन् संयोजक तथा स्वागताध्यक्ष राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी गादी गट मैदान क्रमांक दोनचा ताबा घेतला. कुस्ती सुरू होण्यापूर्वी खोतकर व्यासपीठ सोडून गादीगटाची कुस्ती होणाऱ्या मैदानावर पोहोचले. त्यांनी सहा मिमिटांची कुस्ती सुरू असताना मैदानावर गोल फिरून सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन ते करत होते. कुस्ती संपल्यावर शेख विजयी झाला अन् त्याच्या समर्थकांनी थेट गादी गटाच्या मैदावर उड्या घेतल्या. त्या येणाºया मॉबमधील एकाला तर खोतकर यांनी अक्षरश: दोन्ही हातांनी ढकूलन दिले.कुस्तीस्पर्धा शांततेत पार पडत असतानाच शनिवारी पंचाच्या निर्णयावर वाद होऊन किरकोळ वाद झाला होता. त्या वादाच्या पार्श्वभूमीवर रविवारी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यातच पुन्हा कुठलेही गालबोट लागू नये म्हणून अर्जुन खोतकर हे स्वत: अत्यंत सजग होते.कुस्ती संपल्यावर पंधरा ते वीसजण अचानक कठडे तोडून थेट मैदावर घुसल्याने खोतकर जाम चिडले होते. त्यांनी चटकन आक्रमक होत. त्या सर्व मॉबला त्यांनी अक्षरश: आडवे येत थोपवले. कुस्ती पाहण्यासाठी मोठी गर्दी कुस्तीप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. गर्दी लक्षात घेऊन मैदाना बाहेर मोठा स्क्रीन लावण्यात आला होता. त्यामुळे अनेकांना कुस्तीचा आनंद घेता आला.बजरंग बली की..जय...च्याघोषणेने दुमदुमला आसमंतमहाराष्ट्र कुस्ती स्पर्धेच्या शेवटच्या सहा मिनिटांमध्ये कुस्तीप्रेमींचा उत्साह शिगेला पोहचला होता. सर्वत्र उत्साही वातावरण होते. त्यातच बजरंग बली की, जय या घोषणेने आसमंत दुमदूमून गेला होता.ज्यावेळी दोन्ही मल्ल कुस्तीसाठीच्या गादीवर आले. त्यावेळी उपस्थितांनी आपले श्वास रोखून धरले होते. सर्वत्र एवढी शांतता पसरली की, टाचणी पडली तरी आवाज येईल. परंतु पहिल्या दोन मिनिटातच गतविजेता अभिजित कटकेने बालारफिकला थेट आखाड्या बाहेर फेकून दिल्यावर एकच जल्लोष करण्यात आला. परंतु नंतर कुस्तीने रंग बदलला. प्रारंभी अभिजितच्या ताब्यात ही कुस्ती सहज येईल असा उत्साह अभिजितमध्ये होता. परंतु आखाड्या बाहेर फेकल्यानंतर पुन्हा मैदानावर आलेल्या बालारफिकने फिनिक्स भरारी घेतली.एकापेक्षा एक ऐकरी आणि दुहेरी पटाचे डाव टाकून स्वत:ची गुणतालिका हलती ठेवली. प्रारंभापासूनच बाला रफिक शेखचा आत्म विश्वास व एकाग्रता दिसून येत होती. सहा मिनिटांच्या या थरारात शेवटी बालारफिकने बाजी मारली अन् प्रतिष्ठेचा महाराष्ट्र केसरी किताबावर नाव कोरले. तो विजयी झाल्याचे पंचानी जाहीर करताच टाळ्या वाजवून त्याचे उपस्थितांनी उभे राहून स्वागत केले. आपल्या मुलाची कुस्ती पाहण्यासाठी बालारफिकचे आई-वडिलही मैदावर हजर होते. कुस्तीत बाजी मारल्याचे कळताच त्यांचाही आनंद व्दिगुणित झाला होता.नुरा कुस्ती तर नाही..ना.. -मुंडेकुस्ती स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार हे येणार होते. परंतु ते गोंदिया जिल्ह्यात गेल्याने ते येऊ शकले नाहीत. त्यामुळे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे बक्षीस वितरणासाठी ऐन वेळी निमंत्रणावरून येथे आल्याने कार्यक्रमास चारचाँद लागले. त्यांनी यावेळी त्यांच्या खास शैल्ीात दमदार आवाजात प्रारंभी आयोजकांचे कोतुक केले. परंतु नंतर त्यांनी सांगितले की, तुम्ही लाल मातीच्या कुस्तीत माहीर आहात तर आम्ही राजकीय डावपेचात माहीर आहोत.येथे शिवसेनेचा मित्रपक्ष असलेला भाजपचा एकही पदाधिकारी दिसत नसल्याने तुमची ही कुस्ती अर्थात आगामी लोकसभेचा संदर्भ देत तुमची आणि त्यांची युती होणार की नाही हे अद्याप जाहीर झाले नसले तरी तुम्ही स्वतंत्र लढण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत असल्याने ही नुरा कुस्ती तर नाही ना, असा मिश्किल टोला लगावून सर्वांना खळखळून हसवले.राजेश टोपेंकडून एक लाख रूपयांची घोषणायावेळी महाराष्ट्र केसरी स्पर्धेत किताब मिळवलेल्या बाला रफिक शेख यांना एक लाख रूपयांचे बक्षिस देण्याची घोषणा केली. तसेच अर्जुन खोतकरांनी ही कुस्ती स्पर्धा जालन्यात भरवून क्रीडा वातावरण तयार केले. यातून मराठवाड्यातील पहिलवानांना निश्चितच पे्ररणा मिळेल असे सांगून यातून खिलाडू वृत्ती जोपसण्यास मदत होणार आहे. सध्या सर्वत्र क्रिकेटला महत्व दिले जात आहे. परंतु अस्सल भारतीय खेळ असलेल्या कुस्तीला यामुळे एक प्रकारे राजाश्रय मिळाल्याचे आ. राजेश टोपे यांनी सांगितले.

टॅग्स :Wrestlingकुस्तीArjun Khotkarअर्जुन खोतकरDhananjay Mundeधनंजय मुंडे