शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

खोतकर म्हणजे जालन्याचे लालूप्रसाद - दानवेंचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2018 11:52 IST

शिसवेसेना मंत्री अर्जुन खोतकर म्हणजे जालन्याचे लालू प्रसाद आहेत, अशी टीका करत रावसाहेब दानवें यांनी पलटवार केला आहे.

मुंबई :  शिसवेसेना मंत्री अर्जुन खोतकर म्हणजे जालन्याचे लालू प्रसाद आहेत, अशी टीका करत रावसाहेब दानवें यांनी पलटवार केला आहे. जालन्यातील विकासकामावरुन दानवे-खोतकर यांच्यामध्ये मागिल काही दिवसांपासून शीतयुद्ध सुरु आहे. दोन दिवसांपूर्वी एका प्रसारमाध्यमांशी बोलताना खोतकर यांनी दानवे यांना सत्तेचा माज, मस्ती आणि गुर्मी आहे. माझ्या धाकामुळे त्यांचे हेलिकॉप्टर जमिनीवर आहे, असा घणाघात केला होता. दानवे यांनी यावर खोतकर यांचा खरपूस  समाचार घेत प्रत्युत्तर दिले आहे. 

शिवसेना मंत्री अर्जुन खोतकर काँग्रेसच्या वाटेवर आहेत. काँग्रेसमधील काही लोकांसोबत त्यांच्या बैठका सुरु आहेत. लवकरच खोतकर काँग्रेसमध्ये प्रवेश करतील हे स्टॅम्प पेपरवर लिहून देतो असा गौप्यस्फोट यावेळी दानवे यांनी केला आहे. खोतकरांच्या या हालचालीबाबत 'मातोश्री'वरही माहिती आहे. माझ्यावर शिवसेना संपवण्याचे आरोप करणारे खोतकर स्वतःच शिवसेना संपवायला निघाले आहेत. असेही यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आत्मविश्वासाने सांगितले.  पुढे  अर्जुन खोतकरांचं 'मातोश्री'वर इतकंही वजन नाही, की ते मला बंदी घालू शकतील. उलट त्यांनाच मातोश्रीवर भेटीसाठी तीन-चार तास वाट बघावी लागते, असा दावाही दानवेंनी केला.

काय म्हणाले होते खोतकर - 

  • भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना सत्तेचा माज, मस्ती आणि गुर्मी आहे. माझ्या धाकामुळे त्यांचे हेलिकॉप्टर जमिनीवर आहे. 
  • दानवे आणि त्यांच्या कुटुंबाकडून सत्तेचा गैरवापर सुरु आहे. 
  • रावसाहेब दानवेंचा जालन्यातील सरकारी आधिकाऱ्यांवर प्रचंड दबाव असून सर्वच आधिकाऱी त्यांच्या दहशतीखाली आहेत. 
  • दानवे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना तासनतास आपल्या कक्षाबाहेर उभं करतात, त्यांना घर गड्यासारखं वागवत.   
  • भाजपाध्यक्ष अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटी दरम्यान रावसाहेब दानवे यांना डावलण्यात खुद भाजपाच्या नेत्यांचाच हात होता.
  •  दानवे शिवसेना संपवायला निघाले. 
टॅग्स :Raosaheb Danweरावसाहेब दानवेArjun Khotkarअर्जुन खोतकरBJPभाजपाShiv Senaशिवसेना