खरीप हंगाम : बीटी बियाण्यांची अकरा लाख पाकिटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:29 AM2021-05-14T04:29:40+5:302021-05-14T04:29:40+5:30

खासगी कंपन्यांप्रमाणे महाबीजने देखील खरीप हंगामासाठी बीटी बियाणे नांदेड - ४४ हे वाण उपलब्ध करून दिले आहे. यापाठोपाठ मकाचे ...

Kharif season: 11 lakh packets of Bt seeds | खरीप हंगाम : बीटी बियाण्यांची अकरा लाख पाकिटे

खरीप हंगाम : बीटी बियाण्यांची अकरा लाख पाकिटे

Next

खासगी कंपन्यांप्रमाणे महाबीजने देखील खरीप हंगामासाठी बीटी बियाणे नांदेड - ४४ हे वाण उपलब्ध करून दिले आहे. यापाठोपाठ मकाचे उदय - डीएचएम ११७ हे वाण उपलब्ध करून दिले असल्याची माहिती महाबीजचे येथील व्यवस्थापक शिरीष काळे यांनी दिली.

चौकट

खत, बियाणांचे ७२ नमुने मिळाले

जालना जिल्ह्यातील बियाणांचे ३२ आणि खतांचे जवळपास ४० असे एकूण ७२ नमुने घेतले असून, ते प्रयोगशाळेकडे पाठविले आहेत. येत्या पंधरा ते वीस दिवसांत त्यांचा अहवाल येईल अशी माहिती येथील तुणनिंतयत्रक विशाल गायकवाड यांनी दिली.

चौकट

सरकारच्या निर्णयाचे स्वागत

कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. परंतु शेती तसेच शेती विषयक दुकाने सुरू ठेवून सरकारने मोठा दिलासा दिला आहे. असे असले तरी यंदा खतांच्या किमती वाढल्याने शेतकऱ्यांचे गणित बिघडणार आहे. त्यातच गेल्या वर्षीप्रमाणे सोयाबीन लागवडीकडे यंदाही चांगला कल राहील असे दिसून येत आहे. परंतु सोयाबीनची उगवण क्षमता तपासूनच या बियाणांची पेरणी करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

-------------------------------------

Web Title: Kharif season: 11 lakh packets of Bt seeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.