शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

सॅटेलाईट केंद्रावरून ड्रोन गेल्याने एकच धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 00:34 IST

जालन्यापासून जवळच असलेल्या इंदेवाडी येथील सॅटेलाइट सेंटर - भू-अणूश्रवण केंद्र हे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर आहे. असे असताना बुधवारी दुपारी एका ड्रोनने या केंद्रावरून घिरट्या घातल्याने याची माहिती केंद्रातील अधिकाऱ्यांनी तातडीने पोलीसांना कळविली. ही माहिती मिळताच पोलीस प्रशासन झपाटून कामाला लागले आणि शोधा-शोध सुरू झाला..

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालन्यापासून जवळच असलेल्या इंदेवाडी येथील सॅटेलाइट सेंटर - भू-अणूश्रवण केंद्र हे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर आहे. असे असताना बुधवारी दुपारी एका ड्रोनने या केंद्रावरून घिरट्या घातल्याने याची माहिती केंद्रातील अधिकाऱ्यांनी तातडीने पोलीसांना कळविली. ही माहिती मिळताच पोलीस प्रशासन झपाटून कामाला लागले आणि शोधा-शोध सुरू झाला.. परंतु हा शोध लागल्यावर खोदा पहाड निकला... चुहा या उर्दूतील म्हणी प्रमाणे पोलीस आणि संबंधित यंत्रणेची गत झाली. मात्र देशातील अतिरेक्यांच्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर या अत्यंत महत्वाच्या ठरणा-या केंद्रावरून ड्रोन जाणे म्हणजे गंमतीचा भाग नव्हता हे देखील तेवढेच खरे.जालन्यात इंदेवाडी येथे साधारपणे ३० वर्षापूर्वी या सॅटेलाईट केंद्राची स्थापना केलेली आहे. जालन्यात हे केंद्र होण्यामागे जालन्यातील भौगोलिक स्थिती ही बाब महत्वाची ठरली. या केंद्राचे महत्व हे भारतीय उपग्रहाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. या केंद्रातून भारताने साडेलेल्या विविध उपग्रहांची अवकाशातील स्थिती तसेच त्यावरील नियंत्रण ठेवण्याचे काम येथून अत्यंत गोपनीयरित्या चालते.मध्यंतरी देशभर गाजलेला स्पेक्ट्रम घोटाळ्या नंतर कोणत्या कंपनीला किती स्पेक्ट्रम दिले आणि त्यांनी त्याचा किती वापर केला याची मोजदाद करण्याचे संशोधन येथे करण्यात आले होते. या बद्दल येथील शास्त्रज्ञांचा गौरवही पंतप्रधनांच्या हस्ते करण्यात आला होता.सॅटेलाईट केंद्रावरून ड्रोन गेल्याने एकच धावपळबुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास या सॅटलोईट केंद्रावरून ड्रोन गेल्याचे येथील अधिकाºयांच्या लक्षात आले. या गंभीर बाबीची माहिती लगेचच त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. ही माहिती मिळाल्यावर पोलीस अधीक्षक एस.चैतन्य यांनी अत्यंत गोपनीयपणे पोलीसांना या ड्रोनचा शोध घेण्याचे सांगितले. त्यांनी याचा शोध घेतला असता, हे ड्रोन जालन्यातील नगर पालिकेकडून मालमत्ता कराचे सर्वेक्षण करण्यासाठीचे असल्याचे पुढे आले आणि पोलीस तसेच सॅटेलाई यंत्रणेने सुटकेचा निश्वास सोडला. दरम्यान या एजंसीला ड्रोनव्दारे जालन्यातील मालमत्ता कराचे सर्व्हेक्षण करण्याची परवानगी पालिकेने दिली असल्याचे दिसून आल्यावर नाट्यावर पडदा पडला.

टॅग्स :JalanaजालनाPoliceपोलिस