शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
2
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
3
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
4
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
5
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
6
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
7
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
8
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
9
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
10
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
11
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
12
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
13
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
14
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
15
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
16
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
17
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!
18
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
19
रक्षाबंधन सणासाठी जाताना अपघात; आई-वडीलांच्या डोळ्यांदेखत चिमुकल्याचा मृत्यू, गडचिरोलीतील घटना
20
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य

जालना बाजारपेठेत नवीन तुरीची आवक सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 12:06 IST

बाजारगप्पा : दुष्काळाचा मोठा फटका जिल्ह्यातील तुरीला बसलेला असून उत्पन्नात मोठी घट निर्माण झालेली आहे.

- संजय देशमुख, (जालना )

दुष्काळाचा मोठा फटका जिल्ह्यातील तुरीला बसलेला असून उत्पन्नात मोठी घट निर्माण झालेली आहे. असे असतानाही जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन तुरीची आवक सुरू झाली आहे. मात्र ही आवक फक्त ५० पोते असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदाच्या खरीप आणि रबी हंगामात पूर्वीप्रमाणे ग्राहकी दिसून आली नाही. सोयाबीन वगळता अन्य पिकांचे उत्पादन हे प्रचंड प्रमाणात घटल्याने बाजारपेठेतील उलाढालीवर त्याचा परिणाम झाला आहे. नवीन तुरीची आवक नगण्य असून या तुरीला पाच हजार ते पाच हजार तीनशे रुपये भाव मिळत आहे. हा भाव आठवडाभर तरी कायम राहील, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

मोसंबीची आवक ५० टक्क्यांनी घटली असून, आता पुढील बहार येईपर्यंत तुरळक आवक राहील. हमीभाव खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याचे वास्तव आहे. आॅनलाईन नोंदणीत  दोन हजार एकशे आठ शेतकऱ्यांनी सोयाबीन, उडीद, मूग या पिकांची नोंदणी केली आहे. या केंद्रावर जालन्यातून मूग ६१०, उडीद १७८, सोयाबीनची नोंदणी केलेल्यांची संख्या ४९० एवढी असून, भोकरदन, अंबड, बदनापूर, तीर्थपुरी आणि परतूर, असे एकूण मूग १००६, उडीद ३६१ आणि सोयाबीनची नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची संख्या ही ७४१ एवढी आहे. त्यामुळे आता लवकरच नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांची खरेदी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव गणेश चौगुले यांनी दिली आहे.

दरम्यान सीसीआयकडून कापूस खरेदीचा शुभारंभ सोमवारी बाजार समितीचे सभापती तथा राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते होणार आहे. सीसीआयकडून ही खरेदी सुरू करण्यात येणार असली तरी याला बराच उशीर झाल्याने या केंद्रावर किती शेतकरी कापूस विक्रीसाठी आणतात हा संशोधनाचा विषय ठरू शकतो. जालना बाजारपेठेत कडधान्याच्या भावातील तेजी कायम असून, चना डाळ ५ हजार ८०० ते ६०००, तूर ६ हजार ४०० ते ७००० हजार, मूग डाळ ६ हजार ५०० ते ६ हजार ७०० रुपये, मसूर डाळ ५ हजार ते ५ हजार ४०० रुपये, गव्हाची आवक ही दररोजची शंभर पोती असून, २१०० ते २६०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे.

ज्वारीची मागणी कायम असली तरी त्याचा पुरवठा कमी असल्याने भावातील तेजी याही आठवड्यात कायम आहे. ज्वारीने दोन हजार रुपयांवरून उडी मारून २६०० ते ३ हजार ५०० रुपयांवर झेप घेतली आहे. बाजरीदेखील भाव खाऊन जात असून, सध्या थंडीचे दिवस असल्याने बाजरीला मोठी मागणी असून, भाव वाढले असल्याचे सांगण्यात आले. सध्या १ हजार ९०० ते २४०० रुपये क्विंटलवर भाव पोहोचले आहेत. मक्याची आवक तीन हजार पोती असून, मक्याचे भाव मात्र स्थिर आहेत. मक्याचे भाव क्विंटलमागे १ हजार ४०० ते १ हजार ५०० रुपयांवर आहेत. जालना बाजारपेठेत तुरीप्रमाणेच हरभऱ्याची आवक येत असून, ही आवक दररोज ३०० पोती असून, सध्या हरभऱ्याला ४ हजार ७०० रुपयांचा दर मिळत आहे. 

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी