शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

जालन्याला मार्च एन्डचा फटका; ५० कोटीपेक्षा अधिकचा निधी परत गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 18:31 IST

संबंधित अधिका-यांच्या बेजबादारपणामुळे मिळालेला निधी परत गेल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देबांधकाम विभागाचे ४५ कोटी अन्य विभागाचे मिळून अडीच कोटी परत

- संजय देशमुखजालना : राज्य सरकारने आदेश देऊनही जालना जिल्ह्यातील बांधकाम विभाग तसेच नगररचना विभाग, वन विभाग आणि इतर विभागांचा जवळपास ५० कोटी रूपयांपेक्षा अधिकचा निधी परत गेल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. संबंधित अधिका-यांच्या बेजबादारपणामुळे मिळालेला निधी परत गेल्याचे दिसून येत आहे.

जालना येथील बांधकाम विभाग एक आणि विभाग क्रमांक दोनच्या माध्यमातून विविध रस्ते, पूल तसेच शासकीय इमारतींची उभारणी आणि देखभाल दुरूस्ती केली जाते. जालना जिल्ह्यातील विविध कंत्राटदार हे प्रारंभी टेंडर भरून काम मिळाल्यावर स्वत:च्या पैशातून ही कामे करतात. मार्च एन्डला ही बिले मिळतील या आशेवर हे कंत्राटदार कामे करतात. या कंत्राटदारांकडे जिल्ह्याचा विचार केल्यास पाच ते सात हजार मजुरांचा रोजगार अवंलबून असतो. यंदा ही देयके बीडीएस प्रणालीवर संबंधित विभागांनी २७ मार्च पूर्वी टाकणे बंधनकारक केले होते. असे असतांना अधिका-यांच्या दुर्लक्षामुळे मिळालेला निधी परत गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

त्यात जालना विभाग क्रमांक एकचे जवळपास ४० कोटी आणि विभाग क्रमांक दोनचे ६ कोटी रूपये असे एकट्या बांधकाम विभागाचे ४६ कोटी रूपये तसेच या बांधकाम विभागा अंतर्गत येणाºया विद्युत विभागाचे सव्वा कोटी रूपये परत गेले आहेत. यामुळे कंत्राटदारांसह मजुरांवर आर्थिक संकट कोसळले असल्याचे सांगण्यात आले. हा बीडीएसवर परत गेलेला निधी मिळावा म्हणून दोन्ही विभागांच्या कार्यकारी अभियंत्यांनी शासनाच्या अर्थ विभागाकडे पत्र व्यवहार केला आहे. परंतु त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. परतूर येथील विभाग क्रमांक एकचे अभियंता तर पुणे येथून कार्यालयाचा पदभार चालवित असल्याचा आरोप आहे. या बाबत त्यांच्याशी शुक्रवारी परतूर येथील कार्यालयात संपर्क साधला असता, ते कार्यालयीन कामानिमित्त बाहेरगावी गेले असल्याचे सांगण्यात आले. तर जालन्यातील कार्यकारी अभियंता चांडक यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

बेजबाबदार अधिका-यावर कारवाईची मागणीबांधकाम विभागासह जिल्हा नगररचना विभागाचे ९४ लाख रूपये, वनविभागाचे २५ लाख रूपये देखील परत गेल्याचे सांगण्यात आले. एकीकडे निधी मिळवितांना कशी कसरत करावी लागते हे त्या विभागातील अधिकाºयांना चांगलेच ज्ञात आहे. असे असतांनाही केवळ बेफिकीरी वृत्तीमुळे जिल्ह्याला मिळालेला निधी परत गेल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या असून, या प्रकरणी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी या बेजबादार अधिकाºयांवर कारवाईची मागणी होत आहे.

टॅग्स :JalanaजालनाfundsनिधीMONEYपैसा