शहरं
Join us  
Trending Stories
1
'जात नाही, तर आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण हवे', सुप्रिया सुळेंचे मोठे विधान
2
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
3
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
4
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
5
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
6
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
7
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
8
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
9
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
10
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
11
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
12
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
13
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
14
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
15
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
16
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
18
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
19
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
20
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान

जालना जिल्हा युवक काँग्रेसची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 00:43 IST

जालना जिल्हा युवक काँग्रेसच्यावतीने रविवारी मामा चौक येथे जिल्ह्यातील भारनियमन बंद करणे, पेट्रोल - डिझेल व स्वयंंपाक गॅस चे वाढलेले दर त्वरीत मागे घेणे यासह जालना जिल्हा दुष्काळ जाहिर करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत जोरदार निदर्शने करण्यात आली.

ठळक मुद्देभारनियमन बंद करा : जालना जिल्हा दुष्काळ जाहीर करा, इंधन दर मागे घ्या

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना जिल्हा युवक काँग्रेसच्यावतीने रविवारी मामा चौक येथे जिल्ह्यातील भारनियमन बंद करणे, पेट्रोल - डिझेल व स्वयंंपाक गॅस चे वाढलेले दर त्वरीत मागे घेणे यासह जालना जिल्हा दुष्काळ जाहिर करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत जोरदार निदर्शने करण्यात आली.भाजपाचे केंद्र आणि राज्यातील सरकार शेतकरी आणि कष्टकरी जनतेस वेठीस धरत आहे. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्यात आली नाही. बोंडअळीचे अनुदान रखडले आहे. ऊलट जिल्ह्यात भारनियमन सुरू झाल्याने सामान्य जनता हैराण झालेली आहे. राज्य सरकारने या समस्या त्वरीत सोडवाव्यात म्हणून अशी मागणी करत जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने मामाचौक येथे भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून सरकारचा निषेध करण्यात आला.या आंदोलनामध्ये पेट्रोल- डिझेल, स्वयंपाकाच्या गॅसचे वाढलेले भरमसाठ दर मागे घेण्यात यावे.मोदी सरकारच्या विरोधात घोषणाचे फलक युवकांनी हातात घेतले होते.यावेळी माजी आ. कैलास गोरंट्याल, माजी खा. तुकाराम रेंगे , प्रदेश सरचिटणीस कल्याण दळे, भीमराव डोंगरे, विजय कामड, डॉ. संजय लाखे पाटील, आर. आर. खडके, ज्ञानेश्वर भांदरगे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र राख, राजेश राठोड, डॉ. जितेंद्र देहाडे, विजय चौधरी, वसंत जाधव, बदर चाऊस, आनंद लोखंडे, शेख शमशु, राम सावंत, अ‍ॅड. संजय खडके,जीवन सले, वैभव उगले, शिवराज जाधव, संजय शेजूळ, राहुल हिवराळे, आदी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. आंदोलनाच्या प्रारंभी मुख्य संयोजक जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल देशमुख यांनी प्रस्ताविक भाषणातून केंद्र आणि राज्य सरकार विरूद्ध टिका करून पेट्रोल - डिझेल व स्वयंपाक गॅसचे वाढलेल्या दराबद्दल आणि जालना जिल्हा दुष्काळ जाहीर करण्यात यावा आदी मागण्या संदर्भात केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.या आंदोलनात युवक काँग्रेसचे पदाधिकारी शेषराव जाधव, इब्राहीम कायमखानी, देवराज डोंगरे, जावेद बेग, जुनेद खान, महेश दसपुते, नवीद अख्तर, राहुल वाहुळे, शेख सईद, जहीर यारखान, रवींद्र गाढेकर, मोबीन खान आणि मोहसिन पठाण, गणेश खरात, कृष्णा पडूळ, दत्ता शिंदे, संतोष देवडे, अरूण घडलिंग, नगरसेवक जीवन सले, महावीर ढक्का, रमेश गौरक्षक, राज स्वामी, आरेफ खान, संजय भगत, विनोद यादव, राधाकिसन दाभाडे, रोहीत बनवस्कर, बालकृष्ण कोताकोंडा, राहुल हिवराळे, वाजेद खान, अरूण मगरे, विनोद रत्नपारखे, गोविंदप्रसाद बोराडे, आशिष सामलेट, जावेद अली, वसीम कुरेशी, शेख अफसर, सरफराज बाबा, शेख वसीम, आकाश लाखे, इत्तेशाम मोमीन, नदीम पहेलवान, अफजल सौदागर, मनोज गुढेकर, रमेश भालेराव, सि. के. डोईफोडे, अजीज बिनसमेदा आदी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.भारनियमन बंद करा४यावेळी प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी बोलतांना सांगितले की, केंद्र आणि राज्य सरकारने इंधन दरवाढ मागे ध्यासह दुष्काळ जाहिर न केल्यास युवक काँग्रेस राज्यात मोठे आंदोलन उभे करेल यासाठी हे सरकारच जबाबदार असेल, असा इशारा तांबे यांनी दिला. नुकतेच भारनियमन सुरू केल्यामुळे सामान्य जनता होरपळून निघत आहे. भारनियमन तात्काळ बंद करण्यात यावे नसता वेळप्रसंगी मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही.

टॅग्स :Jalanaजालनाcongressकाँग्रेसagitationआंदोलन