शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
2
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
3
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
4
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
5
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
6
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
7
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
8
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
9
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
10
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
11
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
12
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
13
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
14
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
15
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
16
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
17
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
20
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका

‘महाराष्ट्र केसरी’ साठी जालना जिल्ह्याचा संघ सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 00:29 IST

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद तसेच जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाकडून शहरातील आझाद मैदान येथे १९ ते २३ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या ६२ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी जिल्हा राष्ट्रीय तालीम संघातर्फे निवड चाचणी स्पर्धा घेऊन जिल्ह्याचा संघ जाहीर करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद तसेच जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाकडून शहरातील आझाद मैदान येथे १९ ते २३ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या ६२ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी जिल्हा राष्ट्रीय तालीम संघातर्फे निवड चाचणी स्पर्धा घेऊन जिल्ह्याचा संघ जाहीर करण्यात आला.सदरील निवड चाचणी स्पर्धा शहरातील गुरु रामचरण उस्ताद भक्त कुस्ती आखाड्यात घेण्यात आली. या निवड चाचणी स्पर्धेसाठी जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून तब्बल ३५० मल्लांनी सहभाग नोंदविला. विविध वजन गटात ही स्पर्धा खेळीमेळीच्या व चुरशीच्या लढतीमध्ये पार पडली.तत्पूर्वी जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष किशनलाल उस्ताद भगत यांच्या हस्ते हनुमंताची पूजा व जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे संस्थापक अध्यक्ष स्व. चरण पहेलवान भक्त यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व आखाडा पूजन करून स्पर्धेला प्रारंभ झाला.यावेळी सरचिटणीस प्राचार्य डॉ दयानंद भक्त, उपाध्यक्ष लक्ष्मण सुपारकर, प्रा डॉ आत्मानंद भक्त, गोपाल काबलीये, प्रा डॉ भिक्कूलाल सले, प्रा मंगेश डोंगरे (एन आय एस कुस्ती प्रशिक्षक), प्रा डॉ शाम काबुलीवाले, प्रा डॉ नितीन भक्त, आखाडा कुस्ती प्रशिक्षक भोलानाथ पाल (एन आय एस कुस्ती प्रशिक्षक) आदी पदाधिकारी तसेच दोन ते अडीच हजार कुस्तीशौकिनांची उपस्थिती होती. या निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत खालील विजयी मल्ल राज्यस्तरीय स्पर्धेत जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहेत.एकूणच जालन्यात होऊ घातलेल्या कुस्ती स्पर्धेची तयारी जोरात सुरू असून, आझाद मैदानावर स्टेडीयम उभारणीचे काम सुरू आहे.जालना : ६२ वी कुस्ती स्पर्धाफ्री-स्टाईल गादी गट५७ किलो - प्रथम - शमुवेल थॉमसन जाधव, द्वितीय- सुनील प्रभाकर मोठे, ६१ किलो - प्रथम - अक्षय राजेश धानुरे, द्वितीय - नवल गोविंद झुंगे, ६५ किलो - प्रथम - भूषण कचरू काळे, द्वितीय - इम्रान बाबूशाह, ७० किलो - प्रथम - सयाजी श्रीमंत बाळराज, द्वितीय - भारत कचरू काळे, ७४ किलो - प्रथम - करणसिंग सुरजसिंग ठाकूर. द्वितीय - परमेश्वर साहेबराव खांडके, ७९ किलो - प्रथम - बाळासाहेब अशोक चव्हाण , द्वितीय - रामसिंग चैनसिंग चरावंडे, ८६ किलो - प्रथम - उत्तम बाळासाहेब वीर , द्वितीय - अमोल शिवाजी राऊत, ९२ किलो - प्रथम - ज्ञानेश्वर नामदेव जाधव, द्वितीय - अंकुश राजपूत, ९७ किलो - प्रथम - नारायण नामदेव जाधवमहाराष्ट्र केसरी गट(८६ ते १२५ कि.) - प्रथम - परख दयानंद भक्तफ्री-स्टाईल माती गट५७ किलो - प्रथम - सागर गणेशलाल बटावाले , द्वितीय- आनंद बाबूलाल जाधव, ६१ किलो - प्रथम - स्वप्नील प्रभाकर मोठे, द्वितीय - अतुल भारत क्षीरसागर, ६५ किलो - प्रथम - यश मुकुंद लहाने, द्वितीय - शिवाजी रमेश तौर, ७० किलो - प्रथम - सुरेश ज्ञानेश्वर यज्ञेकर , द्वितीय - संभाजी तुकाराम डोईफोडे, ७४ किलो - प्रथम - अमोल राजेश धानुरे . द्वितीय - राम भगीरथ मोरे, ७९ किलो - प्रथम - सय्यद मोईन सय्यद अफसर , द्वितीय - भाऊसाहेब नामदेव कावळे, ८६ किलो - प्रथम - बालाजी गणेश एलगुंदे , द्वितीय - दारासिंग अजबसिंग डोभाळ, ९२ किलो - प्रथम - जगदीश प्रल्हाद चरावंडे , द्वितीय - ज्ञानेश्वर नामदेव जाधव, ९७ किलो - प्रथम - गोपी चमनबहादूर राजपूत , द्वितीय - संदीप शेषनारायण कोल्हे, महाराष्ट्र केसरी गट (८६ ते १२५ कि.) - प्रथम - विलास सुभाष डोईफोडे

टॅग्स :Wrestlingकुस्तीJalanaजालना