शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

जालना जिल्ह्यात टँकरने गाठला द्विशतकाचा टप्पा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 01:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : जालना जिल्ह्यात यंदा पाणी टंचाईने रौद्ररूप धारण केले असून, फेब्रुवारीच्या मध्यातच जिल्ह्यात टँकरने व्दितशतक ...

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना जिल्ह्यात यंदा पाणी टंचाईने रौद्ररूप धारण केले असून, फेब्रुवारीच्या मध्यातच जिल्ह्यात टँकरने व्दितशतक गाठले आहे. यंदा पाणी टंचाईची गंंभीर स्थिती लक्षात घेता प्रशासनाने टंचाई निवारण्यासाठी ३८ कोटी रूपयांचा आराखडता तयार केला असून, आता पर्यंत जवळपास ११ कोटी रूपये खर्च करण्यात आल्याचे सांगण्यात आले.जालना जिल्ह्यात यंदा पावसाने पाठ फिरवल्याने मोठी दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. पिकांसह यंदा पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होणार ही शक्यता आता वास्तवात उरतले आहे. सध्या जालना शहरासह जिल्ह्यात पाणी टंचाई आतापासून जाणवत आहे.एकीकडे या टंचाईवर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाण्या सारखा पैसा लागणार आहे, ही बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने भूजल सर्वेक्षणाच्या अहवालानंतर कोट्यवधी रूपयांची तरतूद असणारा आराखडा तयार केला होता. मात्र, नंतर त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी परत पाठवून तो केवळ ३८ कोटी रूपयांवर आणला. आता या मंजुर आराखड्यातून सध्या टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येत असतांनाच जुन्या नळयोजनांची दुरूस्ती, नवीन नळ योजनांना मान्यता मिळवून त्या पूर्ण करणे, विहीर अधिग्रहण करण्यात येत आहे.या उपाय योजना आखूनही ही टंचाई दूर होईल असे चिन्ह नसून, टँकरव्दारे पाणीपुरवठा हा तात्पुरता उपाय असल्याचे सांगण्यात आले. कायमस्वरूपी पाणी योजनेसाठी जलयुक्त शिवार ही योजना मोठ्या प्रमाणावर राबवली जात असून, त्यातही यंदा कमी पाऊस झाल्याने पाणीसाठा पुरेसा साठला नाही. त्यामुळे ही योजनाही येथे अयशस्वी ठरली आहे.एकूणच सध्या ज्या गावांकडून टँकरचे प्रस्ताव येतात, त्यांची तातडीने छाननी करण्यात येत आहे. आता टँकर मंजुरीचे अधिकार हे उपविभागीय अधिका-यांना दिले आहेत.हातपंपाची दुरुस्ती गरजेचीजिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर हातपंप घेण्यात आले आहेत. असे असताना ते हातपंप देखभाल दुरूस्तीअभावी बंद पडले आहेत. ते हातपंप दुरूस्त करून त्यात आणखी जादा लोखंडी पाइप टाकल्यास त्यातून हमखास पाणी मिळू शकेल. तसेच या हातपंपावर विद्युत मोटार बसवूनही त्यातून पाणी काढता येऊ शकते, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.प्लास्टिक टाक्या कागदावरपाणीटंचाईवर मात करण्यासाठी सरकारकडून प्लास्टिकच्या टाक्या गावाना देण्यात येण्याची घोषणा केली होती. मात्र अद्यापही कुठल्याच गावांना या टाक्या मिळाल्या नसल्याचे सांगण्यात आले. ही प्लास्टिकची टाकी सार्वजनिक जागेवर ठेवून, त्यात टँकरचे पाणी ओतून त्याला तोटीव्दारे गावक-यांना देण्याची ही योजना आहे.

टॅग्स :water transportजलवाहतूकwater shortageपाणीटंचाई