शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

निवडणुकीसाठी जालना जिल्हा प्रशासन तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 00:35 IST

जालना लोकसभा मतदार संघात जालन्यातील तीन आणि औरंगाबाद जिल्ह्यातील तीन असे सहा विधानसभा मतदार संघ येतात.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना लोकसभा मतदार संघात जालन्यातील तीन आणि औरंगाबाद जिल्ह्यातील तीन असे सहा विधानसभा मतदार संघ येतात. यासाठी जवळपास १४ हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांची गरज लागणार आहे. निवडणुक शांततेत पार पडावी यासाठी आवश्यक तेवढा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, पाच निरीक्षकांची नियुक्त करण्यात येणार आहे. यावेळी सोशल मीडियावरही प्रशासनाचे लक्ष राहणार आहे. निवडणुकी दरम्यान कुठे चुकीचे प्रकार घडत असतील त्यासाठी निवडणुक आयोगाने स्वतंत्र अ‍ॅप लॉच केले आहे. त्यावर तक्रार टाकल्यास तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवून, १०० मिनिटात त्या तक्रारीवर कारवाई करण्यात येणार असल्याची निवडणुक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी सोमवारी दिली.निवडणुकीची सविस्तर माहिती देण्यासाठी त्यांच्या दालनात पत्र परिषदेचे आयोजन केले होते. यंदाच्या निवडणुकांची अनेक वेगळी वैशिष्ट्ये ेअसल्याचे सांगतानाच मतदान केल्यावर संबंधतिला व्हीपॅट मिळणार असून, मतदान यंत्रणात उमेदवाराच्या नावा सोबतच त्यांचे छायाचित्र राहणार आहे. निवडणुकी दरम्यान दिव्यांग मतदारांसाठी देखील विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी उमेदवारी अर्ज भरण्यासह पोस्टल मतदारांना ई-मतदान करता येणार आहे. बोगस मतदान रोखण्यासाठी निवडणूक विभागाने निर्देशित केलेले १२ प्रकारचे ओळखपत्र तत्त्वत: मान्य करण्यात येणार आहेत.पत्रकार परिषदेस पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, निवडणूक उपजिल्हाधिकारी संगीता सानप आदींची उपस्थिती होती.यावेळी दुष्काळाबाबत प्रशासन सतर्क असल्याचे बिनवडे म्हणाले.चौदा हजार कर्मचाऱ्यांची नियुक्तीजालना लोकसभा मतदार संघात निवडणुक प्रक्रिया यशस्वी पार पडण्यासाठी चौदा हजार ७३ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या सर्व अधिकारी, कर्मचाºयांची माहिती ही आॅनलाइन भरण्यात आली आहे. त्यांचे एक प्रशिक्षण पूर्ण झाले आहेत.एकूण मतदार १८ लाख ४३ हजारजालना लोकसभा मतदार संघात एकूण १८ लाख ४३ हजार १३१ एवढे मतदार आहेत. त्यात पुरूष ९ लाख ७७ हजार ७४३, महिला ८ लाख ६५ हजार ३७६ मतदार आहेत. तर तृतीय पंथी मतदारांची संख्या ६ असून, त्यात जालना लोकसभा मतदार संघात येणा-या जालना, बदनापूर आणि भोकरदन आणि औरंगाबाद जिल्ह्यात सिल्लोड, पैठण, फुलंब्री यांचा समावेश आहे. जालना जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघ अनुक्रमे परतूर आणि घनसावंगी हे परभणी लोकसभा मतदारसंघात येतात.१९९० मतदान केंदे्रजालना लोकसभा मतदार संघात एकूण एक हजार ९९० मतदान केंद्र असून, सहायकारी मतदान केंद्रांची संख्या ६६ अशी असून, एकूण दोन हजार ५६ मतदान केंद्रे आहेत. जालना जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघात एक हजार ६३३ मतदान केंदे्र असून, ४५ सहायकारी मतदात केंद्र आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Jalna collector officeजिल्हाधिकारी कार्यालय जालना