शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! जालन्यात रेडीमेड कपड्यांच्या दुकानातून २१ तलवारी जप्त, व्यापारी अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 16:30 IST

महावीर चौकातील कपड्याच्या दुकानात पोलिसांची धाड; २१ धारदार तलवारींसह व्यापाऱ्याला अटक

जालना: शहरातील गजबजलेल्या महावीर चौक परिसरात एका रेडीमेड कपड्याच्या दुकानातून पोलिसांनी तब्बल २१ धारदार तलवारी जप्त केल्या आहेत. सदर बाजार पोलिसांनी गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास ही धाड टाकली. या कारवाईने व्यापारी वर्तुळात आणि शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

गुप्त माहितीने फुटले भांडंमहावीर चौकातील 'जय माता दी मेन्स वेअर' या दुकानात अवैधरीत्या शस्त्रांचा साठा असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक संदीप भारती यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे डीबी पथकाने तात्काळ कारवाईचे नियोजन केले. पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप यांनी पथकासह दुकानात छापा टाकला असता, तिसऱ्या मजल्यावर तलवारींचे घबाड हाती लागले.

२१ तलवारी जप्त, व्यापारी ताब्यातदुकानाची झडती घेतली असता, पोलिसांना १३ मोठ्या आणि ८ लहान अशा एकूण २१ स्टीलच्या धारदार तलवारी आढळून आल्या. या तलवारींच्या मालकीबाबत दुकानदार मनीष दिलीप निहलानी (वय ४३, रा. अजिंठा नगर) याच्याकडे परवान्याची विचारणा केली असता, त्याच्याकडे कोणताही अधिकृत परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी सुमारे २५,९०० रुपये किमतीच्या या तलवारी जप्त केल्या असून आरोपीला ताब्यात घेतले आहे.

यांनी केली कारवाईपोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी आणि डीवायएसपी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. संदीप भारती, सपोनि सचिन सानप आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली. आरोपीविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या तलवारी कशासाठी आणि कुठून आणल्या होत्या, याचा तपास पोलीस करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Jalna: 21 Swords Seized from Clothing Store; Merchant Arrested

Web Summary : Police in Jalna seized 21 swords from a readymade garment shop in महावीर चौक. The shopkeeper, Manish Nihlani, was arrested. He lacked permits for the weapons. Police are investigating the source and intended use.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालना