शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जालना मतदार संघ काँग्रेसकडेच, महायुतीला शह देण्यासाठी कोणाच्या ‘हाता’त पडणार एबी फॉर्म !

By विजय मुंडे  | Updated: April 10, 2024 12:32 IST

मविआच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे लक्ष : पुढील आठवड्यापासून पेटणार राजकीय आखाडा

जालना : जालना लोकसभा निवडणुकीची जागा परंपरेनुसार काँग्रेस पक्षाकडे आली आहे. पुढील आठवड्यातच उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता काँग्रेसचा अर्थात मविआचा उमेदवार कोण ? याकडे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

जालना मतदारसंघात भाजपचे रावसाहेब दानवे तर वंचितकडून प्रभाकर बकले यांची उमेदवारी घोषित झाली आहे. या उमेदवारांनी मतदार संघातील शहरे, गावे पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. परंतु, प्रमुख विरोधक असलेल्या मविआकडून जालन्याची जागा कोणत्या पक्षाला सुटणार व उमेदवार कोण असणार? यावरच पक्षश्रेष्ठींकडून अंतिम निर्णय घेतला जात नव्हता. सांगलीतील जागेवर बरीच गणिते अवलंबून होती. अधिकृत घोषणा होत नसल्याने मविआतील पदाधिकारी, कार्यकर्ते गोंधळात होते. अखेर मंगळवारी गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत मविआच्या नेत्यांनी जागा वाटपाचा तिढा सोडवत घोषणा केली आहे. त्यात परंपरेनुसार जालन्याची जागा काँग्रेसकडे राहिली आहे. त्यामुळे आता महायुतीला अर्थात भाजपला शह देण्यासाठी काँग्रेसचा अर्थात मविआचा उमेदवार कोण राहणार? ‘कोणाच्या हाती पक्षाचा एबी फॉर्म पडणार?’ याची उत्सुकता पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह विरोधकांनाही लागली आहे.

१८ एप्रिल रोजी अधिसूचना होणार जारी१. जालना लोकसभा मतदार संघासाठी १८ एप्रिल रोजी अधिसूचना जारी होणार असून, २५ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत राहणार आहे.२. नऊ दिवसानंतरच निवडणूक प्रक्रिया सुरू होणार असल्याने काँग्रेसकडून उमेदवार जाहीर करण्यास आणखी विलंब होतो की तत्काळ निर्णय घेतला जातो हे पाहणेही महत्त्वाचे आहे.

कल्याण काळे आखाड्यात, मुंढे, राखही चर्चेत काँग्रेसकडून माजी आमदार कल्याण काळे यांचे नाव आघाडीवर असून, पक्षश्रेष्ठींनी संकेत दिल्यामुळे त्यांनी मतदार संघात बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेभाऊ देशमुख, ओबीसीचे नेते सत्संग मुंढे, राजेंद्र राख यांनीही उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून, वरिष्ठ पातळीवर उमेदवारीसाठी या दोन्ही नेत्यांनी जोर लावला आहे. त्यामुळे कल्याण काळेंनाच उमेदवारी मिळते की इतरांना संधी मिळते याकडेही लक्ष लागले आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Jalanaजालना