शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जालना : १०० टक्के बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 00:40 IST

जालना शहरासह तालुक्यात सकल मराठा सामाजाच्या वतीने आयोजित चक्का जाम आंदोलन गुरूवारी शांततेत पार पडले. शहरातील हॉटेल अंबर, एमआयडीसी येथे आंदोलन करणारे आणि पोलीस आमने-सामने आले होते. दोन्ही ठिकाणी सौम्य लाठीमार केल्यावर वातावरण शांत झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना शहरासह तालुक्यात सकल मराठा सामाजाच्या वतीने आयोजित चक्का जाम आंदोलन गुरूवारी शांततेत पार पडले. शहरातील हॉटेल अंबर, एमआयडीसी येथे आंदोलन करणारे आणि पोलीस आमने-सामने आले होते. दोन्ही ठिकाणी सौम्य लाठीमार केल्यावर वातावरण शांत झाले. सकाळी ९ वाजेपासून चक्का जाम आंदोलनास अंबड चौफुली येथून प्रारंभ झाला. त्यानंतर ठरल्या प्रमाणे मंठा चौफुली, चंदनझिरा, मत्स्योदरी महाविद्यालय- नागेवाडीसह जालना तालुक्यातील जामवाडी, गुंडेवाडी, गोंदेगाव, वाघ्रूळ, माळशेंद्रा जामवाडी, रामनगर, वीरेगाव येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी भजन, भारूड आणि पोवाड्यांनी वातावरणात उत्साह भरला होता. जालना शहरात प्रारंभी मराठा समाजातील युवकांनी मोठी मोटार सायल रॅली काढली. जय भवानी..जय शिवाजी... आरक्षण आमच्या हक्काचे, एक मराठा लाख मराठा.. या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. गांधीचमन येथेही मंडप उभारून ठिय्या आंदोलन करण्यात आले. विशेष म्हणजे अंबड चौफुली येथील आंदोलनात महिला व युवतींची मोठी उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. आंदोलना दरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. आंदोलन हे अहिंसक मार्गाने होणार असल्याची घोषणा आधीच संबंधितांनी केली होती.ठिकठिकाणी चक्का जाम आंदोलनजाफराबाद : जाफराबाद तालुक्यात शहरासह वरुड बु, सिपोरा, अंभोरा, माहोरा, जानेफळ, चिंचखेडा, देऊळगाव उगले, कुंभारी, टेंभुर्णी, नळविहरा, खांमखेडा, अकोला देव, यासह मुख्य रस्त्यावर दिसेल त्या पाटीवर हजारोंच्या संख्येने सकल मराठा समाज बांधवांच्या उपस्थितीत चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी अनेक ठिकाणी टायर पेटवून शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला.सकल मराठा समाजाकडून देण्यात आलेल्या बंदच्या हाकेत जाफराबाद शहरात सर्व दुकाने बंद ठेवत व्यापारी बांधवांनी मराठा समाजाच्या मागणीस पाठिंबा देण्यात आला. आंदोलन शांततेत सुरु असताना काही हिंसक प्रवृत्तीच्या आंदोलकांनी एका दुकानावर केलेलली दगडफेक वगळता जाफराबाद तालुक्यात बंद शांततेत पाळण्यात येऊन निषेध नोंदविण्यात आला. गुरूवारी शिवाजी चौकात सकाळी ९ वाजेपासून ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत आंदोलन केले गेले.घनसावंगी बंदघनसावंगी : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनात गुरूवारी घनसावंगी तालुक्यातील सर्व जण उत्साहाने सहभागी झाले होते. यावेळी बाजारपेठेतील सर्व दुकाने बंद होती.तालुक्यातील कुंभार पिंपळगाव, तीर्थपुरी, चिंचोली, घनसावंगी शहर, रांजणी, राणी उंचेगाव येथील व्यापारी संस्थाने व हॉटेल्स व भाजी मार्केट बंद होती. एकूणच घनसावंगी तालुक्यात बंद शांततेत पार पडला.परतूर तालुक्यात कडकडीत बंदपरतूर : तालुक्यात मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर कडकडीत बंद पाळण्यात आला असून, ठिकठिकाणी रास्ता रोको, युवकांचे मुंडण, शासनाचा निषेध करण्यात आला, मात्र हे सर्व करत असताना कुठेही अनुचित प्रकार घडला नसल्याने शांततेचेही दर्शन झाले, हे विशेष.माराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर गुरूवारी बंद ची हाक देत विविध मार्गांनी आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. सकाळ पासूनच बाजारपेठेतील दुकाने उघडलीच नाहीत, शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये बंद होती. रेल्वे स्थानकात व बसस्थानकात प्रवासी नसल्याने शुकशुकाट दिसून आला. तहसील परिसर बँकांचा नेहमी गजबजलेला परिसर निर्मनुष्य होता. जालना - मंठा रोडवर यज्ञापूर, वाटूर फाटा, या राज्य रस्त्यावर सकाळी ९ वाजल्यापासून रास्ता रोको व ठिय्या आंदोलन करण्यात आले.आंदोलकांच्या घोषणांनी शहर दुमदुमले...मंठा : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी गुरूवारी पाहाटे पासूनच शहर कडकडीत बंद करण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षणाच्या मुद्यावरून पुकारण्यात आलेल्या आंदोलनात मंठा शहरासह तालुक्यातील समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.मराठा बांधवाच्या वतीने मोर्चे, ठिय्या-आंदोलन, रास्ता रोको, उपोषण इत्यादी प्रकारे आंदोलन केले. राज्य सरकारकडून नुसत्या 'पोकळ वसा'आश्वासनांचा भडीमार चालू आहे. राज्य सरकारच्या निषेधार्थ मंठा तालुका सकल मराठा समाज बांधवाच्या वतीने राजे संभाजी महाराज चौकात 'ठिय्या आंदोलन करून शासन विरोधी घोषणा देत आंदोलन केले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलकांनी कडक शिस्तीचे दर्शन घडवत आंदोलन शांततेत केले.अंबडमध्ये सर्वत्र चिडीचूप शांतताअंबड : तालुक्यात सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षणाच्या मागणीसाठी गुरुवारी पुकारण्यात आलेले चक्का जाम आंदोलन शांततेत पार पडले. गुरुवार हा अंबड शहराचा आठवडी बाजाराचा दिवस असतानाही सर्वत्र चिडीचूप शांतता दिसली. रस्त्यांवर दुचाकींची तुरळक वर्दळ वगळता अघोषित संचारबंदी लागू आहे की, काय असे चित्र दिसून आले.मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारचा निषेध करत तब्बल ११०० तरुणांनी रस्त्यात मुंडण करुन घेतले. विशेष म्हणजे महिलांनी रस्त्यावर उतरुन आंदोलनात भाग घेतल्याने आंदोलनाची दाहकता वाढली.भोकरदनमध्ये शंभर टक्के प्रतिसादभोकरदन : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी भोकरदन शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळ सकल मराठा समाजाच्या वतीने गुरूवारी सकाळी सुरू केलेले चक्का जाम अंदोलन शंभर टक्के यशस्वी झाले, असून भोकरदनच्या इतिहासात पहिल्यांदाच बाजारपेठेत आणि रस्त्यावर शुकशुकाट दिसला.सकाळी ८ वाजेच्या दरम्यान शिवाजी महाराजाच्या पुतळ्याला पुष्पहार घालून गौरी शिंदे, सुखदा जाधव, मयुरी जाधव, आयुषा जिवरग या मुलीनी शिवप्रतिमेचे पूजन केले. आरक्षणासाठी झालेल्या शहिदांना श्रध्दांजली अर्पण करून आंदोलनाला सुरूवात करण्यात आली.बदनापूरसह तालुक्यात आंदोलनाचे लोणबदनापूर : शहरासह तालुक्यातील अनेक गावातील फाट्यांवर सकल मराठा समाजातर्फे रास्ता रोको, ठिय्या आंदोलन, मुंडण आंदोलन करून शंभर टक्के बंद यशस्वी केला.तसेच अत्यंत महत्वाचा असलेला जालना ते औरंगाबाद हा महामार्ग बंद करण्यात आल्याने गुरूवारी संपूर्ण रस्त्यावर शुकशुकाट होता.मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या बंदला बदनापूर तालुक्यात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. आंदोलकांच्या वतीने जालना-औरंगाबाद महामार्गावर बदनापूर, रोषणगाव फाटा, शेलगाव, खादगाव फाटा, बाजार गेवराई, वरूडी अशा विविध ठिकाणी रास्ता रोको, ठिय्या आंदोलन, मुंडण आंदोलन करण्यात आले. यावेळी हजारो युवकांनी रस्त्यावर उतरून सरकार विरोधात घोषणा देत मराठा आरक्षण देण्याची मागणी केली.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणagitationआंदोलन