शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

जालन्यावरील जलसंकट मानवनिर्मित; चोरीच्या पाण्यावर पोसतेय शेतकऱ्यांची शेकडो एकर शेती ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 17:58 IST

शहराचा पिच्छा करणारे जलसंकट हे मानवनिर्मित असल्याचेच वारंवार समोर येतेय.

ठळक मुद्देव्हॉल्व्ह फोडून असंख्य ठिकाणी दरोडा टाकला जात आहे. जलवाहिनीजवळील ११० ते दीडशे एकर शेती पोसली जाते

- संजय देशमुख 

जालना : स्टील आणि सीड्स उद्योगाबरोबर जालन्याचा पाणीप्रश्नही नेहमीच चर्चेत असतो. शहरावासीयांची वाढलेली तहान लक्षात घेऊन २५० कोटी रुपये खर्च करण्यात आले. पण, शहराचा पिच्छा करणारे जलसंकट हे मानवनिर्मित असल्याचेच वारंवार समोर येतेय. जालन्यासाठी जायकवाडी धरणातून पाणी आणण्यात आले. मात्र, पैठण ते  जालनादरम्यान  अंथरलेल्या जलवाहिनीवरील व्हॉल्व्ह फोडून असंख्य ठिकाणी दरोडा टाकला जात आहे. याच चोरीच्या पाण्यावर जलवाहिनीजवळील ११० ते दीडशे एकर शेती पोसली जात असल्याचे भयावह वास्तव पालिकेच्या पथकाने केलेल्या पाहणीतून समोर आले आहे. 

जालना शहराला पाणीपुरवठा करणारा निजामकालीन घाणेवाडी तलाव हा वाढत्या लोकसंख्येपुढे अपुरा पडल्यामुळे १९८८ मध्ये जालना पालिकेने शहरागड येथे गोदावरीच्या पात्रात बंधारा बांधण्यात आला. या बंधाऱ्यात पुढे पैठण येथील जायकवाडी धरणातून दर महिन्याला काही ठरावीक रक्कम भरून गोदावरीत पाणी सोडण्यात  येते. हे पाणी शहागडला येईपर्यंत भरपूर नासाडी होत होती. तेथून शहागड ते जालना अशी जवळपास ५० किलोमीटरची पाइपलाईन अंथरली. 

शहागड येथील पंपहाऊसद्वारे ते जालन्यापर्यंत आणले जायचे. परंतु या पाइपलाईनलाही परिसरातील शेतकऱ्यांनी भगदाड पाडून शेती फुलवली. तिच गत आता पैठण ते जालना या नव्याने  अंथरण्यात आलेल्या जलवाहिनीचीही झाली आहे. जालना पालिकेने केलेल्या पाहणीत हादरवून टाकणाऱ्या बाबी  समोर आल्या. १८ शेतकऱ्यांनी पाईलाईनवर डल्ला मारत शेती आणि फळबाग फुलवल्या आहेत. सगळीकडे पाण्याचे दुर्भिक्ष असताना पैठण ते पाचोड मार्गावरील शेती मात्र, हिरवीगार आहे. त्याचा शोध घेतल्यानंतर  जलवाहिनीला भगदाड पाडून पाण्याच्या चोरीचा गोरखधंदा उजेडात आला. 

शेतकऱ्यांवर गुन्हे जलवाहिनीचे व्हॉल्व फोडून पाणी चोरी करणाऱ्या सर्व  शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यासाठी नगराध्यक्षा  संगीता गोरंट्याल, मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी पुढाकार घेतला आहे. 

निवडणुकीच्या तयारीत समस्यांकडे दुर्लक्षलोकसभा निवडणुका दारावर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे जालना शहर राजकीय हालचालींचे केंद्र बनले आहे. आठ दिवसांच्या अंतराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जालन्यात येतात. परंतु पाणी, रस्ते तसेच दुष्काळावर ‘ब्र’ न काढता केवळ राजकीय समीकरणे जुळविताना दिसत आहेत. पुढाऱ्यांच्या ‘चलता है’ वृत्तीमुळे सर्वसामान्यांना जार आणि खासगी टँकर विकत घेऊन तहान भागवावी लागत आहे. एकूणच जालन्यात केवळ राजकीय फड रंगत असून, त्या फडापासून नागरी समस्या कोसोदूर आहेत. 

टॅग्स :Farmerशेतकरीwater shortageपाणीटंचाईJalana Muncipalityजालना नगरपरिषदJayakwadi Damजायकवाडी धरण