शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

Jalana: दोन हजार ६५ आंदोलकांवर गुन्हे दाखल: १२ बोअर रायफलमधून हवेत गोळीबार

By दिपक ढोले  | Updated: September 3, 2023 17:03 IST

Jalana: जालना शहरातील अंबड चौफुली परिसरात शनिवारी जाळपोळ आणि दगडफेक करणाऱ्या जवळपास २ हजार ६५ आंदोलकांवर तालुका आणि कदीम पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जालना : जालना शहरातील अंबड चौफुली परिसरात शनिवारी जाळपोळ आणि दगडफेक करणाऱ्या जवळपास २ हजार ६५ आंदोलकांवर तालुका आणि कदीम पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी पोलिसांनी जवळपास ४० जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी १२ बोअर रायफलमधून हवेत गोळीबार केला आहे. अंतरवाली सटारी येथे उपोषणकर्त्यांवर झालेल्या लाठीचार्जचा निषेध करण्यासाठी जालना शहरातील अंबड चौफुली येथे शनिवारी आंदोलन करण्यात आले होते.

या आंदोलनाला काही वेळानंतर हिंसक वळण लागले. आंदोलकांनी गाड्यांची तोडफोड करून पोलिसांवर दगडफेक केली. यात काही वाहनांची जाळपोळही करण्यात आली. जवळपास साडेतीन तास पोलिस आणि आंदोलकांमध्ये चकमक सुरू होती. आंदोलकांनी ट्रक चालक आणि क्लिनरला मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. शिवाय, ट्रक जाळून टाकले. काही वाहनांची तोडफोड देखील केली. शेवटी पोलिसांना १२ बोअर रायफलमधून हवेत गोळीबार करावा लागला. या प्रकरणी सुनिल गांगे यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिस ठाण्यात संशयित मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख, अशोक पडूळ, विश्वभर तिरूखे, देवकर्ण वाघ, राधाकिसन शिंदे, संदीप लांडगे यांच्यासह १५०० ते २ हजार जणांवर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर कदीम जालना पोलिस ठाण्यात जवळपास ६५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

या कलमांखाली गुन्हे दाखलजमाव बंदी आदेशाचे उल्लंघन करून मोठ-मोठाले दगड, लाकडे टाकून, वाहनांची जाळोपाळ करून सार्वजनिक व खासगी मालमत्तेचे नुकसान केल्या प्रकरणी कलम ३५३, ३३२, ३३६, ३३७, ३४१,४३५,१४४,१४३, १४५, १४६, १४७, १४८,१४९,१०९, ११४ भादवीसह कलम १३५ मु.पो. कायदा, सहकलम -३ व ४ सार्वजनिक मालमत्ता नुकसान कायदा, सहकलम ७ क्रिमिनिल लॉ अमेन्टमेन्ट ॲक्ट प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

आतापर्यंत २ हजार ९२६ जणांवर गुन्हे दाखलपोलिसांनी आतापर्यंत गोंदी पोलिस ठाण्यात ३६६, बस जाळल्या प्रकरणी गोंदी ठाण्यातच ५२ आणि ट्रक जाळल्या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात २५०, बदनापूर येथे खासगी वाहन जाळल्या प्रकरणी ६५ आणि दगडफेक केल्या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात दोन हजार, कदीम ठाण्यात ६५ असे एकूण २ हजार ९२६ जणांवर आतापर्यंत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालना