शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

Jalana: अंबडमध्ये वाळू माफियांचा हैदोस, थेट तहसीलदारांवरच ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 19:44 IST

वाळू माफियांचा जीवघेणा हल्ला, स्थानिकांच्या मदतीने आरोपींना पकडण्यात यश

अंबड: जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात वाळू माफियांचा हैदोस सुरू असून, त्यांच्या मुजोरीची हद्द पार करणारी एक धक्कादायक घटना आज घडली. दुधना नदीपात्रात अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या माफियांना पकडण्यासाठी गेलेल्या तहसीलदारांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून त्यांना चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला. सुदैवाने, या जीवघेण्या हल्ल्यातून तहसीलदार बचावले असून, स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने काही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेमुळे महसूल आणि पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.

आज दुपारी अंबड तालुक्यातील घोटण परिसरात दुधना नदीपात्रात बेकायदेशीर वाळू उत्खनन सुरू असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे तहसीलदार विजय चव्हाण यांनी तात्काळ आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली. महसूल पथक येत असल्याचे पाहून वाळू माफियांनी ट्रॅक्टरसह पळ काढण्यास सुरुवात केली.

जीवे मारण्याचा प्रयत्नतहसीलदार विजय चव्हाण यांनी तात्काळ आपल्या पथकासह पाठलाग सुरू केला. पाठलाग सुरू असतानाच, एका वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरच्या चालकाने वेग वाढवला आणि थेट तहसीलदार चव्हाण यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला. हा हल्ला इतका जीवघेणा होता की, थोडक्यात बचावल्याने चव्हाण यांना मोठी दुखापत झाली नाही.

गावकऱ्यांच्या मदतीने यशवाळू माफियांचा हा थरार पाहून स्थानिक गावकरी धावून आले आणि त्यांनी तहसीलदारांना मदत केली. गावकऱ्यांनी केलेल्या सहकार्यामुळे महसूल पथकाला अखेर काही संशयितांना पकडण्यात यश आले. या घटनेमुळे वाळू माफिया किती निर्ढावलेले आहेत आणि ते कायदा आणि सुव्यवस्थेची पर्वा करत नाहीत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरूया प्रकरणी महसूल पथकाने ट्रॅक्टरसह अवैध वाळूचा साठा जप्त केला आहे. ताब्यात घेतलेल्या संशयितांविरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या घटनेनंतर प्रशासनाने अवैध वाळू उत्खननाविरोधात अधिक कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे. महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण करणाऱ्या या माफियांवर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

टॅग्स :JalanaजालनाCrime Newsगुन्हेगारीsandवाळू