शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

Jalana: अनुदान अन् पिकविमा तत्काळ द्या; शेतकऱ्यांचे गोदापात्रात जलसमाधी आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 12:57 IST

जलसमाधी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गोदाकाठी मोठ्या प्रमाणावर शेतकरी आले आहेत.

- पवन पवारवडीगोद्री ( जालना) : अनुदान आणि पीकविमा तत्काळ खात्यात जमा करावे या प्रमुख मागण्यांसाठी अंबड तालुक्यातील शेतकऱ्यांनी गोंदी येथील गोदावरी नदीपात्रामध्ये आज सकाळी ११ वाजेपासून जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे. तत्काळ सर्व मागण्या मान्य करण्याची मागणी करत आंदोलक शेतकऱ्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली.

शेतकऱ्यांना व्हीके नंबर त्वरित द्यावे तसेच केवायसी झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर त्वरित अनुदान जमा करावे, मागील वर्षीचा पिकविमा जमा करावा, ज्या शेतकऱ्यांनी सोलरसाठी ऑनलाईन पेमेंट करून रिजेक्ट केले त्यांचे पैसे परत करावे, तसेच जुने मागील सोलर दुरुस्तीच्या सुविधा उपलब्ध करून द्यावी, पशुवैद्यकीय अधिकारी यांनी कार्यालयात नियमित हजर राहावे, पिकाच्या निकषाप्रमाणे पीक कर्ज वाटप करावे, थकीत पीक कर्जदार शेतकऱ्यांच्या खत्यावरील होल्ड काढावा, वीज पुरवठा सुरळी करावा या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी गोदावरी नदीपात्रात सकाळी ११ वाजेपासून आंदोलन सुरू केले आहे. या पात्रालगत पोलिसांचा बंदोबस्त असून जलसमाधी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गोदाकाठी मोठ्या प्रमाणावर शेतकरी आले आहेत.

मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत बाहेर येणार नाहीआंदोलनात शरद सोळुंके, गजानन उगले,संभाजी मरकड, प्रमोद सोळुंके, अनिल मरकड, पांडुरंग गात, रवी नरवडे, कृष्णा साबळे, शिवम चव्हाण, सचिन चोरमले, लहू बोराडे, शैलेश मरकड, महेंद्र खरात आदी शेतकरी आहेत. मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत नदीपात्राच्या बाहेर येणार नाही असा पवित्रा आंदोलक शेतकऱ्यांनी घेतला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीagitationआंदोलनJalanaजालना