शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

Jalana: ३९ लाखांच्या खंडणीच्या पैशांतून घेतले सोन्याचे दागिने अन् कॅमेरा; तिघे जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 14:40 IST

२१ लाख चार हजारांचा मुद्देमाल जप्त

जालना : एलसीबीच्या पथकाने खंडणी प्रकरणात मंगळवारी सायंकाळी तिघांना जेरबंद केले आहे. या कारवाईत तब्बल २१ लाख ४ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. खंडणीच्या पैशांतून घेतलेले सोन्याचे दागिने आणि कॅमेराही पोलिसांनी जप्त केला आहे.

करण विलास निकाळजे (वय २५), नीलेश रावसाहेब निकाळजे (वय २५, दोघे रा. तांदूळवाडी, ता. जालना), मयूर कुंडलिक निकम (वय २१, रा. कन्हैय्यानगर, जालना) अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. जालन्यातील संस्थाचालक रवी प्रदीप खोमणे यांनी खंडणी प्रकरणात दिलेल्या तक्रारीवरून चंदनझिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा शोध घेत असताना मंगळवारी सायंकाळी एलसीबीच्या पथकाने तीन संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीनंतर संबंधितांनी गुन्ह्याची कबुली देत ७ लाख ९१ हजार ५०० रुपयांची रोकड, दहा लाखांची कार, पिस्टलसारखे दिसणारे लायटर, खंडणीच्या पैशांतून खरेदी केलेले १ लाख ७ हजारांचे सोन्याचे दागिने, २ लाख ५ हजारांचा कॅमेरा असा एकूण २१ लाख ४ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संबंधितांना मुद्देमालासह चंदनझिरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

यांनी केली कारवाईही कारवाई पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, डीवायएसपी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. पंकज जाधव, सपोनि. योगेश उबाळे, पोउपनि. राजेंद्र वाघ, अंमलदार रामप्रसाद पव्हरे, सॅम्युअल कांबळे, रमेश राठोड, प्रभाकर वाघ, लक्ष्मीकांत आडेप, सागर बाविस्कर, संदीप चिंचोले, सतीश श्रीवास, देविदास भोजने, धीरज भोसले, योगेश सहाने, सोपान क्षीरसागर, चालक साैरभ मुळे यांच्या पथकाने केली.

३९ लाख घेतले, नंतर ७० लाख मागितलेसमाजकल्याण आयुक्त कार्यालयातील तक्रार अर्ज मागे घेण्यासाठी ३९ लाखांची खंडणी चेक आणि रोख स्वरूपात घेण्यात आली. नंतर करण निकाळजेचा मामा सुरेश खंडागळे, त्याचा मुलगा गौरव उर्फ बंटी खंडागळे यांनी तक्रार अर्ज करीत तो मागे घेण्यासाठी ७० लाखांची खंडणी मागितली, अशी तक्रार रवी खोमणे यांनी दिली होती. या प्रकरणात करण निकाळजे, सुरेख खंडाळे, गौरव खंडाळे, रूपेश निकाळजे व इतरांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालना