शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
2
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
3
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
4
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
5
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
6
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
7
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
8
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
9
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
10
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
11
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
12
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
13
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
14
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
15
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
16
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
17
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
18
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
19
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
20
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर

भट्टीतील तप्त लोहरस अंगावर पडून २७ कामगार भाजल्या प्रकरणी कंपनीच्या तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 13:50 IST

जालन्याच्या स्टील कंपनीतील घटनेत गंभीररीत्या भाजलेल्या एका कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू; सुरक्षा व्यवस्था नसल्याने कामगार जखमी झाल्याची माहिती

जालना : येथील गजकेसरी स्टील कंपनीत शनिवारी दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण स्फोटात लोखंड वितळविणाऱ्या भट्टीतील तप्त लोहरस अंगावर पडल्याने २७ कामगार भाजले गेले होते. प्रकृती गंभीर असलेल्या सात जणांवर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, ४० वर्षीय कामगाराने उपचारादरम्यान रविवारी सकाळी अखेरचा श्वास घेतला. राम श्रेष्ठ भातुराम (४०) असे मयत कामगाराचे नाव आहे. हा स्फोट इतका भीषण होता की भट्टीपासून ३० फूट लांब काम करणारे कामगारही जखमी झाले. याप्रकरणी चंदनझिरा पोलिसांनी कारवाई करत कंपनीच्या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालकासह तिघांना अटक केली आहे.

जालना येथील एमआयडीसी भागात गजकेसरी स्टील कंपनी असून, या कंपनीत शनिवारी दुपारी नेहमीप्रमाणे काम सुरू असताना लोखंड वितळविणाऱ्या भट्टीत स्फोट झाला. तप्त लोहरस भट्टीजवळ काम करणाऱ्या कामगारांच्या अंगावर पडला. या घटनेत २७ जण जखमी झाले असून, सात गंभीर जखमींना छत्रपती संभाजीनगर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. तर इतर जखमींवर शहरातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली. 

एका कामगाराने उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वासया भीषण स्फोटात लोखंड वितळविणाऱ्या भट्टीतील तप्त लोहरस अंगावर पडल्याने गंभीर जखमी आणि भाजलेल्या ७ जणांना शनिवारी शहरातील बीड बायपासवरील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यात राम श्रेष्ठ भातुराम हे ९८ टक्के भाजले होते. उपचार सुरू असताना सकाळी ७ वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डाॅ. रमाकांत बेंबडे यांनी दिली.

अपघात प्रकरणी तिघांना अटकजखमींपैकी मोहम्मद रफिकोद्दीन मोहम्मद अली यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चंदनझिरा पोलिस ठाण्यात कलम भादंवि १०६,२८९,१२५अ,२२५ ब कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक दिलीपकुमार झा, भट्टी निरीक्षक किशोर राय आणि क्रेन ऑपरेटर लालसिंग प्रजापती या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी चंदनझिरा पोलिसांनी कारवाई करत तिघांना अटक केली आहे. दरम्यान तिन्ही आरोपींना पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अशी माहिती चंदनझिरा पोलिसांनी रविवार दिली.

हे कामगार झाले जखमीया घटनेत रणजित प्रजापती, तुळशीराम दुर्वे, कृष्णा यादव, मंगरू व्हटके, रामदयाल धुर्वे, पित्वसू जैना हे सात कामगार गंभीर जखमी झाले आहेत. तर कांतिलाल ऊईने, सुनील उर्वा, सोनू ऊहाके, सुरज उर्व्हा, मनोजकुमार रॉय, अझरुद्दीन अन्सारी, महंमद रफिकोद्दीन महंमद उस्मान, शुभम रॉय, गुड्डू राम, मनोजकुमार, विशाल कुमार, अशोक रामप्रसाद व इतर कामगार जखमी झाले.

बिहार, उत्तर प्रदेशचे कामगारस्फोटातील जखमींमध्ये बिहार आणि उत्तर प्रदेशातील कामगारांची संख्या अधिक आहे. भट्टीजवळ काम करणाऱ्या या कामगारांसाठी कसलीही सुरक्षा व्यवस्था नसल्याचे समजते. सुरक्षा किट उपलब्ध असते तर कदाचित कामगार गंभीर जखमी झाले नसते, अशी तक्रार कामगार संघटनेने केली आहे.

कामगारांना आर्थिक मदत मिळावीस्टील कंपनीतील भट्टीची वेळेवर देखभाल न केल्याने स्फोट होतो आणि लोहरस अंगावर पडून कामगार भाजतात. सुरक्षा किट असती तर कामगार जखमी झाले नसते. या घटनेला जबाबदार असणाऱ्या व्यवस्थापनावर प्रशासनाने कारवाई करावी आणि जखमींना आर्थिक मदत करावी.-अण्णा सावंत, कामगार नेते

टॅग्स :JalanaजालनाMIDCएमआयडीसीBlastस्फोटCrime Newsगुन्हेगारी