शहरं
Join us  
Trending Stories
1
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा राजीनामा देण्याच्या तयारीत! का घेतला मोठा निर्णय?
2
लाल समुद्रात इंटरनेटची केबल तुटली; भारत-पाकिस्तानसह आशियातील अनेक देशांना फटका
3
रशियाने कीववर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली, कॅबिनेट इमारतीतून धूर निघाला; हल्ल्यात दोघांचा मृत्यू
4
सोने खरेदीचा विचार करताय? थांबा! सोन्याने गाठला नवीन उच्चांक, आठवड्यात ३,९०० रुपयांची वाढ
5
गरिबीचं भीषण वास्तव! खाण्यासाठी पैसे नव्हते, जन्मदात्या आई-वडिलांनी मुलाला ५० हजारांना विकलं
6
पर्थमध्ये पारंपरिक उत्साहात साजरा झाला गणोशोत्सव; मराठी संस्कृतीचे जतन, एकरुपतेचे होते यथार्थ दर्शन
7
डोक्यावर मारला रॉड, चादरीत गुंडाळला मृतदेह अन्...; तिसऱ्या बायकोनं प्रियकरासोबत मिळून केलं कांड!
8
'अमेरिकेने आपल्यावर ५० % कर लादला, भारताने ७५ % लादावा', केजरीवालांचे केंद्राला आवाहन
9
एस्ट्रोनॉमर कंपनीच्या एक्स एचआर प्रमुख कॅबोट यांनी घटस्फोटसाठी अर्ज केला; सीईओ सोबत डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला होता
10
हृतिक रोशनची ही हीरोईन वयाच्या ३९ व्या वर्षीच बनली होती आजी, एकेकाळी रंगली होती अफेअरची चर्चा
11
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी वाढणार महागाई भत्ता, पगार-पेन्शनमध्ये किती वाढ होईल?
12
खग्रास चंद्रग्रहण २०२५: गर्भवती महिलांनी ग्रहण पाहणे अशुभ असते का? पाहा, नियम अन् मान्यता
13
११ वर्षाची मुलगी निघाली सहा महिन्याची गर्भवती, शेजाऱ्याकडूनच अनेकवेळा बलात्कार; जन्मताच बाळाचा मृत्यू
14
बीसीसीआयने मोडले कमाईचे रेकॉर्ड, गेल्या पाच वर्षांत केली एवढी कमाई, आकडा वाचून विस्फारतील डोळे
15
VIRAL : भावाच्या लग्नासाठी कंपनीने सुट्टी नाकारली, त्यानं काय केलं बघाच! आता सगळेच कंपनीला ठेवतायत नावं 
16
पितृपक्ष २०२५: अत्यंत प्रभावी ८ मंत्र, श्राद्ध विधी करताना म्हणा; पितरांच्या कृपेचे धनी व्हा!
17
भय इथले संपत नाही! मेंदू खाणारा अमिबा... केरळमध्ये गंभीर आजाराचं थैमान, ७ जणांचा मृत्यू
18
"याच्यासाठी दादांनी आयपीएस ऑफिसरला झापलं"; अंजली कृष्णा यांना अडवणाऱ्याचा सुषमा अंधारेंनी पोस्ट केला व्हिडीओ
19
लालबागच्या राजाचं विसर्जन खोळंबलं, मूर्ती तराफ्यावर चढवताना आलं असं विघ्न, गिरगाव चौपाटीवर काय घडतंय?
20
मृत्यू पंचकात पितृपक्ष २०२५: ‘या’ ७ तिथींना अधिक महत्त्व; पाहा, पितृ पंधरवड्याच्या मान्यता

Jalana: धामणा व पद्मावती वगळता जुई, जीवरेखा, बाणेगाव धरणांतील पाणीप्रश्न मिटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 19:43 IST

पाचपैकी तीन प्रकल्पांत पाच टक्क्यांपर्यंत पाणीसाठा वाढला, मात्र दोन प्रकल्प ‘जैसे थे’

जालना : जिल्हाभरात मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे भोकरदन-जाफराबाद तालुक्यांतील लघु-मध्यम प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. एप्रिलमध्ये बाष्पीभवनामुळे या धरणातील पाणीपातळीत मोठी घट झाली होती. परिणामी, मे आणि जून महिन्यात नागरिकांवर पाणीसंकट निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात होती. कारण, जुई प्रकल्पात १७, तर धामणा २३, पद्मावती २०, बाणेगाव ३७ आणि जीवरेखा धरणात ११ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला होता; परंतु मे महिन्यात झालेल्या पावसामुळे धामणा आणि पद्मावती वगळता तीन धरणांत १ ते ५ टक्के पाणीसाठा वाढला असून, पाणीटंचाई टळल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत.

भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील जुई, सेलूद येथील धामणा, राजूर परिसरातील बाणेगाव, पद्मावती येथील पद्मावती आणि जाफराबाद तालुक्यांतील अकोला देव परिसरातील जीवरेखा धरणावर दोन तालुक्यांची मदार आहे. उन्हाळ्यात या धरणातील पाणीसाठ्यात घट झाली होती. त्यामुळे या दोन्ही तालुक्यांतील काही गावांत टँकर सुरू केले होते; परंतु या अवकाळी पावसामुळे धामणा आणि पद्मावती वगळता तीन धरणांत १ ते ५ टक्के पाणीसाठा वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.

जुई धरणाचे भोकरदनसह बारा गावांना पाणीदानापूर परिसरातील जुई धरणात एप्रिल महिन्यात तापमान ४२ अंशावर गेल्याने पाणीसाठा १७ टक्क्यांवर आला होता; परंतु मे महिन्यात झालेल्या पावसामुळे धरणात केवळ एक टक्के वाढ झाली असून, भोकरदनसह बारा गावांचा पाणीप्रश्न मिटला आहे.- किरण कतोरे, मोजणीदार.

धरणातील मे आणि जून महिन्यातील पाणीसाठा टक्केवारीमध्येप्रकल्प गाव मेमधील टक्केवारी जूनची टक्केवारी रिकामेजुई -दानापूर-१७-०१-८२धामणा- शेलूद-२३-२३-७७पद्मावती- पद्मावती-२०-२०-८०जीवरेखा-अकोला देव-११-१७-८३बाणेगाव- बाणेगाव-३६-४०-६०

सध्या पाणीटंचाईचे संकट उद्भवणार नाहीजाफराबाद तालुक्यातील जीवरेखा प्रकल्प हा सर्वांत मोठा मध्यम प्रकल्प आहे. मागील वर्षी मार्च महिन्यात धरण कोरडेठाक पडल्याने शेतकऱ्यांनी धरणातून मोठ्या प्रमाणात गाळ काढून नेला आहे. त्यामुळे धरणातील पाणीपातळीत काही प्रमाणात वाढ झाली आहे. मे महिन्यात झालेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात तीन ते पाच टक्क्यापर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे सध्या तरी परिसरातील गावांवर पाणीटंचाईचे संकट उद्भवणार नाही.- बी. आर. जगदाळे, मोजणीदार, जीवरेखा धरण.

टॅग्स :JalanaजालनाDamधरणRainपाऊस