भोकरदन : शहरातील नाकोडा नगर परिसरात एका तरुण अभियंत्याच्या घरावर पेट्रोल टाकून आग लावण्याचा धक्कादायक प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली. दहशत पसरवण्याच्या उद्देशाने हा प्रकार घडवण्यात आल्याचा आरोप असून, भोकरदन पोलिसांनी गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत इंजिनिअर शेख तालेब शेख रऊफ (वय २९, रा. मन्नत मेंशन, नाकोडा नगर, भोकरदन) यांनी फिर्याद दिली आहे. दि. १० फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे १:५४ वाजता त्यांच्या राहत्या घरासमोर हा प्रकार घडला. अनिल गावंडे (रा. भोकरदन) व त्याच्यासोबत दुचाकीवर आलेल्या एका अनोळखी व्यक्तीने संगनमत करून फिर्यादीच्या घरावर पेट्रोल टाकून आग लावण्याचा प्रयत्न केला.
यात घरासमोरील झाडांच्या कुंड्या, दरवाजाजवळील पायपुसणे व चपला जळून नुकसान झाले. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. मात्र, या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक पवन राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून, घटनास्थळाची पाहणी करण्यात आली आहे.
Web Summary : In Bhokardan, an attempt to set an engineer's house on fire with petrol created panic. Fortunately, major casualties were avoided. Police have registered a case against the accused, Anil Gawande, and an unknown accomplice for attempted arson. Investigation is underway.
Web Summary : भोकरदन में एक इंजीनियर के घर को पेट्रोल डालकर जलाने के प्रयास से दहशत फैल गई। सौभाग्य से, बड़ी जनहानि टल गई। पुलिस ने आरोपी अनिल गावंडे और एक अज्ञात सहयोगी के खिलाफ आगजनी का प्रयास करने का मामला दर्ज किया है। जांच जारी है।