शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

Jalana Accident: उभ्या ट्रकला धडकल्या दोन दुचाकी; दोघे जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 19:08 IST

डिझेल संपल्याने चालकाने ट्रक रस्त्याच्या बाजूला उभा केला होता.

जालना : डिझेल संपल्याने रस्त्याच्या बाजूला उभा असलेल्या ट्रकला दोन दुचाकी धडकल्याची घटना जालना तालुक्यातील सिंधी काळेगाव येथे सोमवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. यात दोघेजण जागीच ठार झाले आहेत. मनोज अंकुश राठोड (२५ रा. काकडा तांडा), ज्ञानेश्वर मधुकर डवले (३२ रा. किहाळा वडगाव, ता. मंठा) अशी मयतांची नावे असल्याची माहिती पोलीस कर्मचारी बेराड यांनी दिली.

ट्रक क्रमांक (एमएच. २६. ८८१२) हे सोमवारी रात्री नांदेडला जात होते. जालना- मंठा रोेडवरील सिंधी काळेगाव परिसरातील अंबिका धाब्याजवळ ट्रकचे डिझेल संपले. त्यामुळे चालकाने ट्रक रस्त्याच्या बाजूला उभा केला होता. चालक डिझेल आणण्यासाठी गेला होता. साडेआठ वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस सुरू झाला. त्याचवेळी बुलेट क्रमांक (एमएच.१८.एव्ही.३०) ने मनोज राठोड हे गावाकडे जात होते. पावसामुळे त्यांना ट्रक न दिसल्याने बुलेट ट्रकला धडकली. यात ते जागीच ठार झाले. त्यांना रूग्णालयात पाठविण्यात आले. 

काही वेळाने ज्ञानेश्वर डवले यांची दुचाकीही ट्रकला धडकली. यात ते जागीच ठार झाले. घटनेची माहिती तालुका पोलिसांना देण्यात आली. तालुका पोलीस ठाण्याचे एएसआय सय्यद व पोलीस कर्मचारी बेराड यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूJalanaजालना