शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सगळ्या गावांना दिले, मग आम्हालाच का वगळलं; अनुदानापासून वंचित शेतकऱ्यांचा सवाल

By महेश गायकवाड  | Updated: April 3, 2023 17:04 IST

खरीप हंगामातील शेवटच्या टप्प्यात सततचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उभे पीक पाण्यात गेले होते.

जाफराबाद : जाफराबाद तालुक्यातील वरुड बुद्रुक या महसूल मंडळातील २२ गावांना शासनाने अतिवृष्टीच्या अनुदानातून वगळले.  शेतीपिकांचे नुकसान होऊनही सरकार करत असलेल्या अन्यायाच्या विरोधात संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढत आपल्या व्यथा मांडल्या. येणाऱ्या सात दिवसांच्या आत अनुदानाच्या यादीत आमचा समावेश करा, नसता आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा उपस्थित शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिला.

खरीप हंगामातील शेवटच्या टप्प्यात सततचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उभे पीक पाण्यात गेले होते. वरुड बुद्रुक मंडळात पडलेल्या पावसाची नोंद पर्जन्यमापक यंत्रात चुकीची झाल्याने या महसूल मंडळातील ९ हजार ७८५ बाधित शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित राहावे लागले आहे. त्यामुळे राजकीय हेतू बाजूला ठेवून सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित येत तहसील कार्यालयावर नुकसानभरपाईसाठी मोर्चा काढला. शासनाने अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांची यादी जाहीर केली. या यादीत तालुक्यातील पाच मंडळांपैकी वरुड बुद्रुकचा समावेश करण्यात आला नाही. पर्जन्यमापक यंत्रातील आकडेवारीवरून शासनाने या मंडळातील शेतकऱ्यांना अनुदानातून वगळले. दुसऱ्या मंडळातील शेतकऱ्यांची जमीन वरुड मंडळात असताना त्यांना अनुदान मिळत आहे; मात्र या मंडळातील शेतकऱ्यांना वंचित राहावे लागले आहे. ही शासनाच्या यंत्रातील चुकीचा फटका हजारो शेतकऱ्यांना बसला आहे.वरुड बुद्रुक मंडळातील अनेक गावे ही डोंगराळ भागाला जोडून असल्याने सततच्या अतिवृष्टीमुळे पिकं वाहून गेली होती. शेतात पाणी साचल्याने शेतातील पिके सडून गेली होती. ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्यावर अतिवृष्टीची नाेंद होते. प्रत्यक्षात पीक पाण्याखाली तरी यंत्रात नोंद होत असेल तर त्याच्यात आमचा काय दोष, असा प्रश्न शेतकऱ्यांनी यावेळी उपस्थित केला. यावेळी माजी सभापती रमेश गव्हाड, मयूर बोर्डे, गजानन लोखंडे, एल. बी. शिंदे, मंगेश गव्हाड, राजेंद्र सोनवणे, गजानन शिंदे यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊसJalanaजालनाagricultureशेती