अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान
अंबड : गत काही दिवसांपासून बदलणाऱ्या वातावरणामुळे पिकांवर मोठा परिणाम होत आहे. त्यात गुरुवारी मध्यरात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे या भागातील रब्बी पिकांना मोठा फटका बसला आहे. फळबागांचेही यात मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहता, प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.
कुंभार पिंपळगाव येथे ३० जणांचे रक्तदान
घनसावंगी : तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे शिवजयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात ३० जणांनी रक्तदान केले. पोनि शिवाजी बंटेवाड यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पोउपनि शिवसिंग बहुरे, कर्मचारी रामदास केंद्रे, डॉ.गणेश तौर, डॉ.संजीव ढवळे, रामेश्वर लोया, ज्ञानेश्वर आर्दड, बापुसाहेब आर्दड, डॉ.कृष्णा कोकणे आदींची उपस्थिती होती.
शिवजयंतीनिमित्त सायकलची फेरी
भोकरदन : शिवजन्मोत्सवानिमित्त तालुक्यातील आलापूर येथील युवकांनी सायकल फेरी काढली. सरपंच विजय मिरकर यांच्या पुढाकारातून काढण्यात आलेल्या सायकल फेरीत राजेंद्र मिरकर, विलास मिरकर, वैभव मिरकर, अतुल मिरकर, वाजेद शहा, अमोल मिरकर, आयुष मिरकर, प्रशांत मिरकर आदी युवकांनी सहभाग नोंदविला होता.